Advertisement

थकित पाणी बिल एकरकमी भरण्याची अट बीएमसीकडून शिथिल

मुंबईत (mumbai) पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. या थकबाकीदारांकडून पाणीपट्टी (water tax) वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने (mumbai municiple corporation) अभय योजना (Abhay Yojana) सुरू केली आहे.

थकित पाणी बिल एकरकमी भरण्याची अट बीएमसीकडून शिथिल
SHARES

पाणी बिलाच्या ( water bill) थकबाकीवर अतिरिक्त शुल्क भरण्यापासून विशेष सूट देणाऱ्या अभय योजनेला (Abhay Yojana) चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (mumbai municiple corporation) अभय योजनेला ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर एकरकमी प्रलंबित पाणी बिलांचे पैसे भरण्याची अट शिथील करण्यात आली आहे. आता प्रत्येक बिलांनुसार पैसे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. 

नागरिकांनी योजनेचा लाभ घेऊन थकीत पाणी बिल भरावं असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे. कोरोनामुळे या आधी अभय योजनेला ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मुंबईत (mumbai) पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. या थकबाकीदारांकडून पाणीपट्टी (water tax) वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने (mumbai municiple corporation) अभय योजना (Abhay Yojana) सुरू केली आहे. पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जातं. मात्र, अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केलं जातं. 

मुंबई महानगरपालिका दररोज सव्वा कोटींपेक्षा अधिक रहिवाशांना सरासरी 385 कोटी लीटर पिण्याचे पाणी पुरवते. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवणारी महापालिका असा मुंबई महानगरपालिकेचा लौकिक आहे. पाणीपुरवठा नियमितपणे व्हावा, याकरिता रहिवाशांनी त्यांची बिले एका महिन्यात भरणं बंधनकारक आहे. तसंच एक महिन्याच्या आत बिलाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त पैसे दंड म्हणून आकारला जातो. बिलाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला २ टक्के यानुसार ही आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकारणीबाबत जलजोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे. 

या आधी थकीत पाणी बिलातील जलआकार, मलनिःसारण आकार आणि जलमापक भाडे यांचे एकरकमी पैसे भरून अभय योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र, आता सर्व प्रलंबित बिले एकरकमी भरण्याऐवजी प्रत्येक बिलानुसार ग्राहकांना पैसे भरूनही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी पालिकेच्या जल अभियंता खात्यातील सहाय्यक अभियंता (जलकामे) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुंबई मपालिकेने केलं आहे.



हेही वाचा -

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक

शुभवार्ता! केरळमध्ये दाखल होतोय मान्सून

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा