Advertisement

मुंबईतील कंटेन्मेंट झोन घटून ६७४ वर, बघा महापालिकेची संपूर्ण यादी

मुंबईत आता ६७४ कंटेन्मेंट झोन आहेत. महापालिकेने १२ मे २०२० रोजी सादर केलेल्या यादीच्या (२,६४३ कंटेन्मेंट झोन) तुलनेत ही संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घटली आहे.

मुंबईतील कंटेन्मेंट झोन घटून ६७४ वर,  बघा महापालिकेची संपूर्ण यादी
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) १७ मे २०२० रोजी मुंबईतील कंटेन्मेंट/रेड (containment zones or red zones in Mumbai) झोनची अपडेटेड लिस्ट जारी केली आहे. या यादीनुसार मुंबईत आता ६७४ कंटेन्मेंट झोन आहेत. महापालिकेने १२ मे २०२० रोजी सादर केलेल्या यादीच्या (२,६४३ कंटेन्मेंट झोन) तुलनेत ही संख्या तब्बल ७५ टक्क्यांनी घटली आहे.   

कंटेन्मेंट झोनची नवी व्याख्या

आतापर्यंत मुंबईतील कोणत्याही परिसरात कोरोना रुग्ण आढळला की तो भाग कंटेन्मेंट (प्रतिबंधित क्षेत्र) झोन म्हणून घोषीत केला करण्यात येत होता. त्यामुळे या ठिकाणी पालिकेची आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी लागायची. तसंच तिथं पोलीस बंदोबस्तही ठेवावा लागायचा. यासाठी मोठं मनुष्यबळ लागायचं. शिवाय कंटेन्मेंट झोनच्या वाढत्या आकड्यांमुळे मुंबईकरही धास्तावले होते. 

पण मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल चहल यांनी कंटेन्मेंट झोनची नवी व्याख्या तयार केली आहे. त्यानुसार मुंबईत कुठेही कोरोनाचा एक-दोन रुग्ण आढळला तर तो भाग थेट कंटेन्मेंट झोन घोषित न करता त्या रुग्णाला तातडीने पालिकेच्या अलगीकरण कक्षात हलवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या घटली आहे.

हेही वाचा - केडीएमसी परिसरात ६ नवीन कोरोना रुग्ण, कंटेन्मेंट झोनची यादी बघा...

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली असून मुंबईनेही २० हजारांचा (२०,१५०) आकडा पार केला आहे. रविवार १७ मे रोजी दिवसभरात २३४७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी ७ झोन तयार करून प्रत्येक झोनची जबाबदारी एका आयएएस अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे.

वाॅर्ड आणि एरिया (वाॅर्डनिहाय क्लिक करा)कंटेन्मेंट झोनची संख्या May 17, 2020कंटेन्मेंट झोनची संख्या  May 12, 2020
वाॅर्ड A- चर्चगेट, कुलाबा आणि नेव्ही नगर
10
16
वाॅर्ड B- मस्जिद बंदर, मो. अली रोड, डोंगरी आणि भेंडीबाजार
952
वाॅर्ड C- पायधुनी आणि भुलेश्वर
3550
वाॅर्ड D- ग्रँट रोड, वाळकेश्वर, ब्रीच कँडी ते हाजी अली आणि मलबार हिल
2582
वाॅर्ड E- भायखळा, मदनपुरा, आग्रीपाडा, नागपाडा, डाॅकयार्ड रोड, रे रोड आणि चिंचपोकळी
24218
वाॅर्ड F North- माटुंगा, सायन, वडाळा आणि हिंदू काॅलनी
22116
वाॅर्ड F South- परळ, भोईवाडा, भोईवाडा, नायगाव, चिंचपोकळी, शिवडी आणि वडाळा
35108
वाॅर्ड G North- धारावी, माहीम आणि दादर
15
273
वाॅर्ड G South- वरळी आणि प्रभादेवी
13144
वाॅर्ड H East- वांद्रे पूर्व, खार पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व
19165
वाॅर्ड H West- वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ
2359
वॉर्ड K East- अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि विले पार्ले पूर्व
31120
वॉर्ड K West- अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विले पार्ले पश्चिम
12255
वॉर्ड L- साकिनाका, चांदिवली, असल्फा आणि कुर्ला
148278
वॉर्ड M East- मानखुर्द, अणुशक्ती नगर, देवनार, चिता कॅम्प आणि शिवाजी नगर
5255
वॉर्ड M West- चेंबूर, सिंधी सोसायटी, छेडा नगर आणि टिळक नगर
2097
वॉर्ड N- घाटकोपर, विद्याविहार आणि पंत नगर
11109
वॉर्ड P North- मालाड, मार्वे, मनोरी, अक्सा आणि मढ
33102
वॉर्ड P South- गोरेगाव पूर्व आणि पश्चिम 
1166
वॉर्ड R Central- बोरिवली पूर्व आणि पश्चिम
1053
वॉर्ड R North- दहिसर पूर्व आणि पश्चिम
2726
वाॅर्ड R South- कांदिवली आणि चारकोप
3581
वाॅर्ड S- भांडुप, पवई, कांजुरमार्ग, विक्रोळी आणि नाहूर
4489
वाॅर्ड T- मुलुंड
1029

हेही वाचा - मिरा-भाईंदरमध्ये कोरोना हाॅटस्पाॅट वाढले, बघा संपूर्ण कंटेन्मेंट झोन लिस्ट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा