दूषित पाण्याचा पुरवठा

 Goregaon
दूषित पाण्याचा पुरवठा
दूषित पाण्याचा पुरवठा
See all

गाेरेगाव - गेल्या अनेक आठवड्यापासून गोरेगाव पूर्वेकडच्या महानगरपालिका वसाहतीतल्या नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. यासंदर्भात लाेकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथले रहिवासी चंद्रकांत गावडे यांनी केलीय. परिसरातील शाैचालयाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये मिसळलं जातंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसराचे व्यवस्थापन करणारे जल अभियंता एस. संखे यांच्याशी संपर्क केला असता, 'दाेन दिवसात समस्येचं निवारण करून पिण्यायोग्य पाणीपुरवठा केला जाईल' असं आश्वासन त्यांनी दिलं.

Loading Comments