Advertisement

ठाकुर्लीतल्या हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट

ठाकुर्ली स्टेशन (Thakurli station) परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा (Cooker) भयानक स्फोट (Blast) झाला.

ठाकुर्लीतल्या हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट
SHARES

ठाकुर्ली स्टेशन (Thakurli station) परिसरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा (Cooker) स्फोट (Blast) झाल्याचं समोर येत आहे. स्फोटात हॉटेलच्या मालकाला गंभीर दुखापत (Deadly injured) झाली आहे. 

जखमी मालकावर (Hotel owner) सध्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कलय्या स्वामी सेलवन असं या 40 वर्षीय हॉटेल मालकाचं नाव आहे. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदर हॉटेल डोंबिवली नजीकच्या ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात आहे. या हॉटेलचं नाव 'हॉटेल सौभाग्य न्यू किचन' असं आहे. कलय्या आणि त्यांची पत्नी मयुरी हे दाम्पत्य सदर हॉटेल चालवते. शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तसंच पार्सलची सुविधा देखील या हॉटेलमधून दिली जाते. 

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एका ग्राहकानं चिकन हंडीची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर बनवण्यासाठी कलय्या स्वामी यांनी चिकन ऍल्युमिनियमच्या कुकरमध्ये शिजवण्यास ठेवलं. मात्र काही वेळानं या कुकरचा स्फोट झाला.हेही वाचा

प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळं लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुर्घटनांचे सत्र सुरूच

प्रदूषणाच्या पातळीत वाढ; मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय