• पोलिसांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात
  • पोलिसांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात
  • पोलिसांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात
SHARE

अंधेरी - पूर्व येथील मरोळच्या पोलीस वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. पडझड झालेल्या इमारतीला आधार म्हणून बांबू लावण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या वतीने या इमारतींना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. पण, पोलिसांच्या कुटुंबियांचं अन्य सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांना याच जिवघेण्या इमारतींमध्ये रहावं लागतंय.

इमारत मोडकळीला आल्यामुळे रहायचं कुठे आणि कसं? हे प्रश्न पोलिसांच्या कुटुंबियांना भेडसावत आहेत. मरोळच्या पोलीस वसाहत B-4 मध्ये राहणाऱ्या अजित पाटील यांना विचारलं असता इमारतीची दुरवस्था झाली आहे. तरी अजूनही आमच्या कुटुंबियांना स्थलांतरित करण्यात आलेलं नाही. आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन जगत आहोत. या बिल्डिंगमध्ये जवळपास 30 हून अधिक परिवार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या