Advertisement

देशात २४ तासांत २२ हजार ८५४ नवे रुग्ण


देशात २४ तासांत २२ हजार ८५४ नवे रुग्ण
SHARES

देशात यावर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात २२ हजार ८५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १२६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी १२ लाख ८५ हजार ५६१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ५८ हजार १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या २४ तासांत १८ हजार १०० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ कोटी ९ लाख ३८ हजार १४६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ८९ हजार २२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. बुधवारी महाराष्ट्रात पहिल्यांदाच यावर्षातल सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथे कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा