Advertisement

दिलासादायक! मुंबईत कोरोनावर मात केलेल्यांच्या संख्येत वाढ

मुंबईत सोमवारी ३४७ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ६ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त म्हणजे ४२० होती.

दिलासादायक! मुंबईत कोरोनावर मात केलेल्यांच्या संख्येत वाढ
SHARES

मुंबईत सोमवारी ३४७ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ६ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त म्हणजे ४२० होती. मुंबईत एकूण रुग्णसंख्या ७ लाख ३५ हजार ४०३ झाली आहे. तर करोनामुक्तांची संख्या ७ लाख १२ हजार १६२ झाली आहे.

सध्या मुंबईत ४ हजार ८२३ उपचाराधीन रुग्ण आहेत. शहरात रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २७१ दिवसांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात २,७४० नव्या रुग्णांचे निदान झाले, तर २७ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६५ लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर सध्या ४९,८८० रुग्ण उपचाराधीन आहेत.

सर्वाधिक १३ हजार उपचाराधीन रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. गेल्या २४ तासांत नगर जिल्ह्यात ६००, पुणे जिल्हा ३१८, पुणे शहर १३०, सोलापूर २२८, सातारा १७७, रत्नागिरीत ४८ नवे रुग्ण आढळले. ठाणे जिल्ह्यात सोमवारी २४९ करोना रुग्ण आढळून आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा