Advertisement

महापौर किशोरी पेडणेकरांकडून मिनी लॉकडाऊनचा इशारा

वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मुंबईत पूर्ण लॉकडाऊन ऐवजी मिनी लॉकडाऊन करण्याची सध्या चर्चा सुरु आहे.

महापौर किशोरी पेडणेकरांकडून मिनी लॉकडाऊनचा इशारा
SHARES

वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मुंबईत पूर्ण लॉकडाऊन ऐवजी मिनी लॉकडाऊन करण्याची सध्या चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या दररोजच्या आकडेवारीतील ४० ते ४५ टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईमध्ये आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता मुंबई महानगर महापालिका कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

सध्या मुंबईत लॉकडाऊन लावण्यात येण्याची शक्यता असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. कुठलेही निर्बंध आणायचे झाल्यास त्यावर मुख्यमंत्री विचार करतात. दिवसाला मुंबईतील रुग्णसंख्या चारपटीने वाढत असून हे चिंताजनक आहे. लोकांनी घरच्या घरी सभारंभ साजरे करावेत. रेल्वे आणि बेस्टमधील कर्मचारी बाधित होण्याची संख्या चिंता वाढवणारी आहे. डॉक्टरही रुग्ण होत आहेत ही सर्वांसाठी चितेंची बाब आहे. 

महाराष्ट्रामध्ये योग्य निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारांमध्ये होणारी गर्दी पाहून लोकांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसत नाही. ही वेळ घरात बसण्याची निश्चित नाही पण घाबरण्याचीही नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी टिव्ही९ सोबत बोलताना म्हटले आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये सुमारे पाच हजारांची भर नव्याने पडत आहे. 

बुधवारी पालिकेने सुमारे ६० हजार चाचण्या केल्या असून यातून २० हजार १८१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. बाधितांपैकी ८५ टक्के म्हणजेच १७ हजार १५४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत, तर १ हजार १७० रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. 

यातील १०६ रुग्णांना प्राणवायू लावावा लागला आहे. गुरुवारी दिवसभरात २,८३७ रुग्ण करोनामुक्त झाले. गुरुवारी मुंबईत चार जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबईसह राज्यात करोना रुग्णवाढ होत असली तरी उपनगरी रेल्वे प्रवासावर तूर्त निर्बंध लागू करण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. तसेच शनिवार-रविवारी लॉकडाऊन किंवा जिल्हाबंदीचाही तूर्त विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा