Advertisement

मुंबईत दिवसभरात १२९८ नवे रुग्ण, ६० जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३१ हजार ८५६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत दिवसभरात १२९८ नवे रुग्ण, ६० जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाने १०० जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२९८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- नाराजी नव्हतीच, फक्त समानता हवी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचं घुमजाव

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६० रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १२९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६३ हजार ७९९ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३१ हजार ८५६ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- पॉझिटिव्ह रिपोर्ट रुग्णांना सांगू नका, पालिकेच्या नियमावर मनसे नाराज

राज्यातील रुग्ण वाढीचा वेग कमी होत असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत आहे. सध्या हा कालावधी सुमारे २६ दिवसांवर गेला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज  १६७२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६० हजार ८३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५३ हजार ९०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात सध्या ५८ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०१ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख १७ हजार ६८३  नमुन्यांपैकी  १ लाख २० हजार  ५०४  नमुने पॉझिटिव्ह (१६.९३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८१ हजार  ६५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात २२०३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ९२ हजार १४१ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७४० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


० १४ जून पर्यंत राज्यात २ लाख ६१ हजार २१० कोविड चाचण्या झालेल्या आहेत

० सक्रीय कंटेनमेंट झोन झोपडपट्टी आणि चाळी – ८२८

० सक्रीय सील बंद इमारती – ४८५९

० २४ तासांमधील संपर्काचा शोध अति जोखिम - ७५६९

० सद्या CCC1 मधील अति जोखिम संपर्क – २०३८४

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा