Advertisement

मुंबईतल्या 'या' रुग्णालयातला आॅक्सिजनचा पुरवठा वाढवला

विशेष म्हणजे कोविड रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे ओळखून पालिका आणि आरोग्य विभागाने निरनिराळी मोठी रुग्णालये व भव्य कोरोना उपचार केंद्र (जम्बो फॅसिलिटी) मिळून १४ ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू केली आहे

मुंबईतल्या 'या' रुग्णालयातला आॅक्सिजनचा पुरवठा वाढवला
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील रुग्णांना विशेष कोविड रुग्णालयासोबतच पालिका आणि आरोग्य विभागाकडून इतर यंत्रणांही पुरवल्या जात आहे. त्यात एक भाग म्हणून कोविड १९ बाधित रुग्णांसाठी पालिका आणि आरोग्य केंद्राकडून आता २० ठिकाणी वाढीव ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.


कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना. कोविड रुग्णांसाठी बेडची संख्या ही वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोविड  रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे ओळखून पालिका आणि आरोग्य विभागाने निरनिराळी मोठी रुग्णालये व भव्य कोरोना उपचार केंद्र (जम्बो फॅसिलिटी) मिळून १४ ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर  सुरू केली आहे. हे यंत्रणा बसवण्याचे काम आता टप्प्यात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आलेले आहे. त्याच बरोबर इतर ६ रुग्णालयांमध्ये देखील गरजेनुसार याप्रकारची यंत्रणा बसण्यात येणार आहे. ही ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यासाठी १३ हजार किलोलीटर व ६ हजार किलोलीटर अशा दोन प्रकारातील अवाढव्य ऑक्सिजनच्या टाक्या विविध १४ ठिकाणी लावण्याचे काम सुरू आहे. तर इतर ६ रुग्णालयांमध्ये १ हजार लीटर क्षमतेच्या टाक्या लावण्यात येणार आहे.  तर काही  रुग्णालयात टाक्या बसवण्यासाठी परिसरांमध्ये योग्य जागेचा शोध सुरू आहे.

ऑक्सिजन पुरवठा होणारी विविध ८ कोरोना उपचार केंद्रांची नावे-

 वरळी एनएससीआय डोम १३ हजार लीटर (१), महालक्ष्मी रेसकोर्स १३ हजार लीटर (१), दहिसर टोल नाका १३ हजार लीटर (१), दहिसर बस आगार १३ हजार लीटर (१), मुलूंड येथील रिचर्डसन क्रूडास १३ हजार लीटर (२), गोरेगाव नेस्को १३ हजार लीटर (२), वांद्रे –कुर्ला संकुल (भाग १) १३ हजार लीटर (१), वांद्रे-कुर्ला संकुल (भाग २) १३ हजार लीटर (१).

ऑक्सिजन पुरवठा होणारी विविध ६ रुग्णालयांची नावे-

शीव (सायन) येथील महानगरपालिका रुग्णालय ६ हजार लीटर (१), कस्तुरबा रुग्णालय ६ हजार लीटर (१), नायर रुग्णालय १३ हजार लीटर (१) आणि ६ हजार लीटर (१), केईएम रुग्णालय १३ हजार लीटर (१), घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय ६ हजार लीटर (१), कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय ६ हजार लीटर (१).

ऑक्सिजन पुरवठा होणारी इतर ६ रुग्णालयांची नावे-

 भगवती रुग्णालय १ हजार लीटर (२), कुष्ठरोग उपचार रुग्णालय १ हजार लीटर (१), धारावी नागरी आरोग्य केंद्र १ हजार लीटर (२), गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय १ हजार लीटर (१), कुर्ला भाभा रुग्णालय १ हजार लीटर (२), कामाठीपुरा नेत्र रुग्णालय १ हजार लीटर (१).

याव्यतिरिक्त जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय, बोरिवलीचे भगवती रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय,  वांद्रे येथील भाभा रुग्णालय, गोरेगाव स्थित नेस्को कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी मिळून १०० ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सदेखील पुरवण्यात येत आहेत.

हेही वाचाः- अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलमानच्या वडिलांचे प्रत्युत्तर

हेही वाचाः- रिया चक्रवर्ती चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा