Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 'इतक्या' कैद्यांना, तर ५६ कर्मचाऱ्यांना संसर्ग

तुरुंगामधील बऱ्याच कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 'इतक्या' कैद्यांना, तर ५६ कर्मचाऱ्यांना संसर्ग
SHARES

मुंबईत कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या तिसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची व त्याचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण झाली. विशेष म्हणजे या लाटेत तुरुंगामधील बऱ्याच कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यातील तुरुंगामधील २९१ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यासोबत ५७ तुरुंग कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

तिसऱ्या लाटेमध्ये तुरुंगातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं समजतं. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तुरुंगात आलेल्या कैद्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे. तुरुंगात दाखल करण्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई व ठाणे तुरुंगात प्रत्येकी ७ कैद्यांना तिसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ भायखळा तुरुंगातील सहा कैदी कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात एका महिला कैद्याचा समावेश आहे. कल्याणमध्ये पाच कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

येरवडा मध्यवर्ती तुरुंगातील सर्वाधिक म्हणजे ५१ कैद्यांना तिसऱ्या लाटेत करोनाची बाधा झाली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर येथे ३०, सातारा येथे १५, अहमदनगर येथे ३९, नागपूरमध्ये २०, औरंबादमध्ये ११, अकोलामध्ये १८ व लातूरमधील आठ कैदी करोनाबाधित झाले आहेत.

त्याशिवाय ५७ तुरुंग कर्मचाऱ्यांनाही तिसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात कोल्हापूरमधील १३, ठाण्यातील २, तळोजातील १, साताऱ्यातील ३, तर नाशिकमधील ४ जणांचा समावेश आहे.

राज्यातील तुरुंगामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये कोरोनाबाधित कैद्यांची संख्या वाढली होती. त्यामुले तुरुंगातील कैद्यांच्या चाचणीत वाढ करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख २३ हजार ४८२ चाचण्या केल्या आहेत.

त्यात आतापर्यंत ५ हजार २२७ कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ४ हजार ९२३ कैद्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा