Advertisement

छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी २२ जण कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी २२ जण कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शुक्रवारी राज्यात दिवसभरात ३६ हजारांहून अधिक नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. अशातच राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानातही कोरोनाने शिरकाव केला आहे. भुजबळ यांच्या निवासस्थानातील अनेकजणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील रामटेक या निवासस्थानी असेलल्या एकूण २२ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. रामटेकवर गेली दोन दिवस कोरोनाची तपासणी हाती घेण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेतल्या जात असून काहींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्रथम रामटेकवर ११ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

अजूनही या निवासस्थानातील इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. तर चाचण्या घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी असून रामटेकमधील बाधितांची संख्या वाढू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर निघत होते. भुजबळ नाशिकमधील येवले येथील विविध विकासकामांचा शुभारंभ करणार होते.

भुजबळ यांनी काल नाशिकला घेतलेल्या बैठकीत उपस्थित असलेले सिव्हिल सर्जनना करोनाची लागण झाली आहे. याच कारणामुळे भुजबळ यांनी आपला नाशिक दौरा तूर्तास रद्द केला आहे. दरम्यान, राज्यात काल कोरोनाची मोठी वाढ झाली असून दिवसभरात ३६ हजार २६५ नवे रुग्ण आढळले आहेत. मात्र, असे असले तरी काल दिवसभरात राज्यात १३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, दिवसभरात एकूण ८ हजार ९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच राज्यात काल ओमिक्रॉनच्या एकूण ७९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा