Advertisement

Coronavirus pandemic: राज्यात कोरोनाचे 2287 नवीन रुग्ण, 38 हजार 493 रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 72 हजार 300 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Coronavirus pandemic: राज्यात कोरोनाचे  2287  नवीन रुग्ण, 38 हजार 493 रुग्णांवर उपचार सुरू
SHARES
Advertisement

राज्यात आज 1225 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  2287 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 38 हजार  493 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 72 हजार 300 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 453 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 097 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 103 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 68 पुरुष तर 35 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 103 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59  रुग्ण आहेत तर 39 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 5 जण 40 वर्षांखालील आहे. या 103 रुग्णांपैकी 69 जणांमध्ये ( 67 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2465 झाली आहे. 

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे 1 मे ते 30 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 75 मृत्यूंपैकी मुंबई 29,  मिराभाईंदर 9, सोलापूर 4, नवी मुंबई 3, रायगड 3, सांगली 3, पनवेल 2, अकोला 3, ठाणे 1, नाशिक 1, अहमदनगर 1 अशी मृत्यूची नोंद आहे.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 333 रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील 140 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3730 झोन क्रियाशील असून आज एकूण 19 हजार 019 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 71.61  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
Advertisement