Advertisement

राज्यात मंगळवारी दिवसभरात ४०२१ रूग्ण कोरोनामुक्त


राज्यात मंगळवारी दिवसभरात ४०२१ रूग्ण कोरोनामुक्त
SHARES

राज्यात एकीकडं कोरोनाची लाट ओसरत असल्याचं बोललं जातं असलं तरी, देखील अद्याप दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही कधी कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तसंच, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे. 

राज्यात मंगळवारी दिवसभरात ४ हजार २१ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ३ हजार १३१ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर, ७० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४४,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२ टक्के एवढे झाले आहे.

आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,२७,६२९ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३८६१६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७३,०७,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२७,६२९ (११.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,७२,०९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४०,७१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा