Advertisement

महाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण?, अहवाल निघाला खोटा

एका अंदाजानुसार महाराष्ट्रात एप्रिल-मे २०२० पर्यंत २.५ कोटींहून (over 25 million) अधिक तर अंदाजे ३ कोटी जणांना कोरोनाची (COVID19+ cases in maharashtra) लागण झालेली असेल, असं या अहवालात म्हटलं होतं, पण हा अहवाल खोटा निघाला आहे.

महाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण?, अहवाल निघाला खोटा
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची (coroncvirus) संख्या वाढत चाललेली असताना अमेरिकेतील एका संस्थेने काढलेला निष्कर्ष अतिशय धक्कादायक मानावा लागेल. अमेरिकेच्या जाॅन हाॅपकिन्स युनिव्हर्सिटी अँड रिसर्च फाॅर डिसिजीस डायनॅमिक्स, इकाॅनाॅमिक अँड पाॅलिसी (CDDEP) या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात एप्रिल-मे २०२० पर्यंत २.५ कोटींहून (over 25 million) अधिक तर अंदाजे ३ कोटी जणांना कोरोनाची (COVID19+ cases in maharashtra)  लागण झालेली असेल, असं या अहवालात म्हटलं होतं. परंतु हा अहवाल खोटा असल्याचं हाॅपकिन्स युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की नवीन अहवाल जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ च्या सह प्राध्यापकांनी लिहिलेला आहे. हा अहवाल उपलब्ध डेटा आणि स्पष्ट गृहितकांवर आधारित आहे. याआधीच्या अहवालावर प्रिन्सटन विद्यापीठाचा योग्य लोगो नव्हता. त्यामुळे हा अहवाल खात्रीलायक आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून त्यात दुरुस्ती करणं गरजेचं होतं. त्यानुसार नवीन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. असा खुलासा युनिव्हर्सिटीकडून करण्यात आला आहे.

४० कोटींपर्यंत जाणार

सध्या देशभरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळून आले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून देशपातळीवर प्रशासन आणि आरोग्य विभागांकडून प्रयत्न केले जात आहेत. देशभरात लाॅकडाऊन (lockdown) लागू करण्यात आलं असून केवळ जीवनावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. असं असूनही देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. याकडे पाहता जुलै २०२० पर्यंत संपूर्ण देशभरात कोरोनाची (COVID19+ cases in India) लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली होती.  

महाराष्ट्रात ६ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील (maharashtra) करोनाग्रसतांची संख्या १७७ झाली आहे. 

हेही वाचा- Coronavirus Update: भारत बनवणार ‘हजमत सूट’, कोरोनापासून बचावाचं कवच!

तिसऱ्या टप्प्यात प्रवेश

सध्या आपण कोरोना व्हायरस (COVID-19) प्रसाराच्या स्टेज २ म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातच आहोत. त्यामुळे परदेशातून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपुरतीच या व्हायरसची लागण मर्यादीत आहे. नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेऊन त्याची तपासणी केली जात आहे, असं भारताच्या आरोग्य विभागाकडून सांगितलं जात आहे. 

अधिक लोकसंख्या

परंतु भारतात मार्च महिन्याच्या अखेरीस स्टेज ३ ला सुरूवात झाली असून हा व्हायरस आता समाजातही पसरू लागल्याचं हा अहवाल सांगतो. भारतात अत्यंत दाटीवाटीने लोकं राहतात. मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोनाचा संसर्ग वाढणं सहज असल्याचं हा अहवाल सांगतो. या अहवालात कोरोनाच्या उच्च, मध्यम आणि सामान्य श्रेणीनुसार सविस्तर विवेचन करण्यात आलं आहे.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी भारत जास्तीत जास्त ५० हजार व्हेंटिलेटर्स (ventilators) ची व्यवस्था करू शकतो. परंतु परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला भारतात १ कोटी व्हेंटिलेटर्सची तरी आवश्यता असल्याचं वा अहवाल सांगतो.

हेही वाचा- यूपीतल्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था करा, आम्ही खर्च देऊ, योगी आदित्यनाथ यांची उद्धव ठाकरेंना विनंती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा