Advertisement

Coronavirus update: भारत बनवणार ‘हजमत सूट’, कोरोनापासून बचावाचं कवच!

भारताने स्वदेशी तत्वावर या सूटचं उत्पादन करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी ६ कंपन्यांना आॅर्डर देण्यात आली आहे. भारतात एका हजामत सूटची किंमत सरासरी २५०० रुपये आहे.

Coronavirus update: भारत बनवणार ‘हजमत सूट’, कोरोनापासून बचावाचं कवच!
SHARES

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) विळख्यात अडकून युरोपातले देश अक्षरश: मेटाकूटीला आले आहेत. भारतातही दिवसागणिक हा विषाणू आपले हातपाय पसरू लागला आहे. या विषाणूच्या कचाट्यात सापडलेल्या रुग्णांना वाचवण्यसाठी भारतातले डाॅक्टर्स, नर्स, वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून वाॅर्डबाॅयपर्यंत (doctors and nurse) सर्वच जण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. परंतु या लोकांच्या जीवालाही मोठा धोका आहेच. हे ओळखून केंद्र सरकारने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खास ‘हजमत सूट’ (hazmat suit) बनवण्याचं ठरवलं आहे.

स्वदेशी निर्मिती

जगभरात हजमत सूटची मागणी वाढत असल्याने या सूटची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे भारताने स्वदेशी तत्वावर या सूटचं उत्पादन करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी ६ कंपन्यांना आॅर्डर देण्यात आली आहे. भारतात एका हजामत सूटची किंमत सरासरी २५०० रुपये आहे.   

हेही वाचा- महिंद्रा देणार फक्त ७५०० रुपयांत व्हेंटिलेटर्स!

कसं नावं पडलं?

हेजार्डस मटेरियल सूट असं या सूटचं नाव असून त्याला शाॅर्टमध्ये 'हजमत सूट' असंही म्हटलं जातं. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (PPE) या प्रकारात हा सूट मोडतो. हा सूट डोक्यापासून ते पायापर्यंत संरक्षण देतो. सोबत ग्लव्ह्ज आणि चष्माही घातला जातो. इबोला, सार्स विषाणूच्या हल्ल्यात हजमत सूटनेच पाश्चात्य देशातील डाॅक्टर, नर्सला संरक्षण कवच दिलं होतं. हा सूट कुठल्याही व्हायरसच्या हल्ल्यात चोख कामगिरी करतो. शिवाय रासायनिक पदार्थ, जैविक हल्लत ढाल म्हणून वापरता येतो. 

हा सूट वापरण्यासाठी वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे प्रोटोकाॅल्स आहेत. हा सूट ए, बी, सी, डी अशा अनेक लेव्हलमध्ये उपलब्ध होतो. ए श्रेणीतील सूट अतिउच्च दर्जाचं संरक्षण देतो. यापासून विषारी पदार्थ, गॅस, रासायनिक द्रव्य, विषाणू हल्ला इ. पासून संरक्षण मिळतं. या सूटसोबत आॅक्स्िजनची देखील व्यवस्था केलेली असते. हा सूट पूर्णपणे एअर टाईट असतो. हा सूट घालण्यासाठी किमान अर्धा तास लागतो. कपड्यांच्या वर हा सूट घातला जातो. त्यानंतर ग्लव्हज, चष्मा आणि शूज घातले जातात. हा सूट अंगातून काळजीपूर्वक काढावा लागतो. डोक्याकडून पायाकडे अशा तऱ्हेने हा सूट काढावा लागतो. 

हेही वाचा- रक्तदात्यांनो पुढं या! राज्यात आठवडाभर पुरेल इतकंच रक्त- राजेश टोपे

कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून तब्बल १९४ देशातील ४,२३,१४२ हून अधिक जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. १८,९०६ हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा