Advertisement

ठाण्यात रुग्णांसाठी नवीन सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक

रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सी.आर. वाडिया दवाखान्यात नवीन दंत चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे.

ठाण्यात रुग्णांसाठी नवीन सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक
SHARES

ठाणे (thane) महानगरपालिकेने (thane municipal corporation) तीन हात नाका येथील सी.आर. वाडिया दवाखान्यात (dental clinic) आधुनिक सुविधांनी सुसज्ज सुपर स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुरू केले आहे.

नवीन क्लिनिकमध्ये दंत तपासणी, दाताची साफसफाई, पोकळ भरणे आणि दात काढणे (tooth extractions) यासारख्या उच्च दर्जाच्या मोफत सेवा दिल्या जातील. या क्लिनिकसाठी दोन तज्ञ डॉक्टरांची (specialist doctors) नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) अशाच प्रकारच्या सेवा उपलब्ध असल्या तरी रुग्णसंख्येचा जास्त भार असल्याने वेटींगमुळे लोकांना अनेकदा खाजगी दवाखान्यांमध्ये जावे लागते.

खाजगी दवाखान्यातला उपचार खर्चिक असल्याने अनेकांना ते परवडत नाही. तसेच यातील अनेक उपचार विमा पॉलिसींमध्ये अनेकदा समाविष्ट नसतात.

रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सी.आर. वाडिया दवाखान्यात नवीन दंत चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे.

यासोबतच, खासदार नरेश म्हस्के यांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे इतर अनेक सुविधांचा शुभारंभ केला.

पेट केअर ठाणे सॉफ्टवेअर अंतर्गत, कुत्रे, मांजरी आणि इतर पाळीव प्राण्यांची डिजिटल नोंदणी केली जाईल. ज्यामुळे लसीकरण आणि आरोग्याबाबत नोंदी राखण्यास मदत होईल.

आयुष्मान आरोग्य केंद्रे बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधे, गर्भवती महिलांसाठी तपासणी आणि मानसिक आरोग्य यासारख्या सेवा प्रदान करतील.



हेही वाचा

मेट्रो 4 वरील विक्रोळी मेट्रो स्थानक 'या' रेल्वे स्थानकाला जोडणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 15 विशेष गाड्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा