
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Divas) त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे (central railway) 4 डिसेंबर 2025 ते 8 डिसेंबर 2025 पर्यंत मुंबईसाठी (mumbai) 15 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
(अ) नागपूर ते सीएसएमटी - 4 सेवा
04/12/2025 रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या
ट्रेन क्रमांक 01260 नागपूर (nagpur)-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 18.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01262 नागपूर-सीएसएमटी (CSMT) विशेष गाडी नागपूरहून 23.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
05/12/2025 रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या
ट्रेन क्रमांक 01264 नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 08.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01266 नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी नागपूरहून 18.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
थांबा: अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.
(ब) सीएसएमटी ते नागपूर - 4 सेवा
06/12/2025 रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या
ट्रेन क्रमांक 01249 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटीहून 20.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.20 वाजता नागपूरला पोहोचेल.
07/12/2025 रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या
ट्रेन क्रमांक 01251 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटीहून 10.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 00.55 वाजता नागपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01255 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटीहून 12.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.00 वाजता नागपूरला पोहोचेल.
08/12/2025 रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या
ट्रेन क्रमांक 01257 सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी सीएसएमटीहून 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 16.10 वाजता नागपूरला पोहोचेल.
(क) दादर ते नागपूर - 1 सेवा
07/12/2025 रोजी सुटणारी विशेष ट्रेन
ट्रेन क्रमांक 01253 दादर (dadar) -नागपूर विशेष ट्रेन दादरहून 00.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 16.10 वाजता नागपूरला पोहोचेल
थांबा: दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी
*मुंबई-नागपूर विशेष ट्रेनसाठी रचना:- 16 सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि 2 सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन (18 आयसीएफ कोच)
(ड) कलबुर्गी-सीएसएमटी-कलबुर्गी - 2 सेवा
ट्रेन क्रमांक 01245 विशेष ट्रेन कलबुर्गीहून 18.30 वाजता सुटेल. 05/12/2025 रोजी सीएसएमटी येथे पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.20 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01246 विशेष गाडी 7/12/2025 रोजी सकाळी 00.25 वाजता सीएसएमटी येथून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.
*कंपोजिशन 22 सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि 2 सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन (24 आयसीएफ कोच)
थांबा: दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड आणि गाणगापूर रोड.
(ई) अमरावती-सीएसएमटी- अमरावती – 2 सेवा
ट्रेन क्रमांक 01218 विशेष 05/12/2025 रोजी 17.45 वाजता अमरावतीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.25 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01217 विशेष 07/12/2025 रोजी 00.40 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी 12.50 वाजता अमरावतीला पोहोचेल.
*कॉम्पोझिशन 16 सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि 2 सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन (18 ICF कोच)
थांबा: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा.
(फ) कोल्हापूर-सीएसएमटी-कोल्हापूर – 2 सेवा
ट्रेन क्रमांक 01402 विशेष गाडी 05/12/2025 रोजी 16.40 वाजता कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.05 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01401 विशेष गाडी 06.12.2025 रोजी 22.30 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.00 वाजता कोल्हापूरला पोहोचेल.
*कॉम्पोझिशन 16 सेकंड स्लीपर / जनरल सेकंड क्लास / चेअर कार आणि 2 सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन (18 ICF कोच)
थांबा: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, चिचवड, पुणे, जेजुरी, लोणंद. सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले
सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस द्वारे करता येते.
या विशेष गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देण्याचे किंवा NTES अॅप डाउनलोड करण्याचे प्रवाशांना आवाहन केले आहे.
हेही वाचा
