Coronavirus cases in Maharashtra: 230Mumbai: 92Pune: 30Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

महिंद्रा देणार फक्त ७५०० रुपयांत व्हेंटिलेटर्स!

कोरोना व्हायरसचा (coronavirus) मुकाबला करण्यासाठी डाॅक्टरांना व्हेंटिलेटर्सची सध्याच्या घडीला नितांत आवश्यकता आहे. अशा संकटाच्या काळात महिंद्रा अवघ्या ७५०० रुपयांमध्ये व्हेंटिलेटर (ventilators) उपलब्ध करून देणार आहे.

महिंद्रा देणार फक्त ७५०० रुपयांत व्हेंटिलेटर्स!
SHARE

कोरोना व्हायरसचा (coronavirus) मुकाबला करण्यासाठी डाॅक्टरांना व्हेंटिलेटर्सची सध्याच्या घडीला नितांत आवश्यकता आहे. अशा संकटाच्या काळात वाहन उद्योगातील देशातील मोठी कंपनी असलेल्या महिंद्राने अवघ्या ७५०० रुपयांमध्ये व्हेंटिलेटर (ventilators) उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे ठेवला आहे. बॅग व्हॉल्च मास्क व्हेंटिलेटर ज्याला बोली भाषेत अंबू बॅग म्हटलं जातं अशा स्वरुपातील व्हेंटिलेटर बनवण्यासाठी ३ दिवसांत मंजुरी मिळेल अशी अपेक्षा महिंद्र अँड महिंद्रा (Mahindra & mahindra) समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी ही माहिती आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

कोरोनाचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव पाहता व्हेंटिलेटरची मोठी गरज निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर यंत्रणा अधिक सुटसुटीत करून त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही एका उत्पादक कंपनीसोबत दोन मोठ्या सार्वजनिक उपक्रमांवर काम करत असल्याची माहिती पवन गोयंका (pawan goenka) यांनी दिली आहे.

५ ते १० लाख किंमत

तर, आयसीयू व्हेंटिलेटर बनवणाऱ्या एका स्वदेशी कंपनीसोबत आम्ही काम करत आहोत. आमच्या टीमने तयार केलेली यंत्रणा आपत्कालीन स्थितीत (अंबु बॅग ) काही कालावधीपर्यंत रुग्णाचं जीवन वाचवण्यात सक्षम आहे. या मशिनची किंमत ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असली, तरी ती जवळपास ७,५०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (anand mahindra) यांनी एक ट्विट करून सांगितलं आहे.

व्हेंटिलेटर्स कुणाला?

कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांना सौम्य संसर्ग होत असल्याने त्यांच्यावर घरीच वेगळे ठेऊन उपचार करता येऊ शकतात. तर उतरलेल्या २० टक्क्यांपैकी ५ टक्के रुग्णांना आयसीयू अाणि व्हेंटिलेटर सुविधेची आवश्यकता लागते.

देशात किती व्हेंटिलेटर्स?

सध्या देशातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयात मिळून एकूण ३० हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. यापैकी ८० टक्के व्हेटिंलेटर्स-आयसीयू खासगी रुग्णालयांत उपलब्ध आहेत. 

आर्थिक समन्वय आणि विकास संस्था म्हणजेच ओईसीडीच्या १८ मार्च २०२० च्या आकडेवारीनुसार दक्षिण कोरियात १ हजार लोकांमागे १२.३ बेड आहेत, चीनमध्ये ४.३, इटलीत ३.२ आणि अमेरिकेत १ हजार लोकांमध्ये २.८ बेड (१ लाख ६० हजार, राखीव १२,७०० व्हेंटिलेटर्स) आहेत. तर भारतात १ हजार लोकांमागे ०.५ बेड आहेत. जर्मनी २५ हजार व्हेंटिलेटर्स.

निर्यातीवर  सरकारची बंदी

व्हेंटिटेलर्सची वाढती गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य महासंचालकांनी २ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर बनवणाऱ्या आणि आयात करणाऱ्या कंपन्यांंसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत रोज किती व्हेंटिलेटर्सचं उत्पादन करता येईल? असा प्रश्न विचारतानाच उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले होते. सध्या केंद्र सरकारने आवश्यक वैद्यकीय उपकरणांवरील निर्यातीवर बंदी घातली आहे. पण भारतात बनवण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटर्सचे पार्ट‌्स चीनमधून येत असल्याने कंपन्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्याचमुळे महिंद्राने स्वदेशी कंपनीसोबत काम करण्यास सुरूवात केली आहे. 


संबंधित विषय
ताज्या बातम्या