Advertisement

खुशखबर! मुंबईतील हार्डवेयर, इलेक्ट्रॉनिक शॉप होणार सुरू

पालिका आयुक्त प्रविण परदेशींनी परिपञकाद्वारे दिले आदेश

खुशखबर! मुंबईतील हार्डवेयर, इलेक्ट्रॉनिक शॉप होणार सुरू
SHARES

मुंबईत कोरोनामुळे सर्व काही ठप्प असले, तरी मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. गुरूवार पासून मुंबईतील हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने सुरू करण्यास पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी परवानगी दिली आहे. बुधवारी राञी उशिरा याबाबतचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.

कोरोनामुळे ठप्प झालेल्या मुंबईसह महाराष्ट्राचे आर्थिक मोठे नुकसान झाले आहे. मागील एका महिन्यापासून शहरातील अत्यावश सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईसह महाराष्ट्राला मिळणारा महसूल बंद झाला आहे. तर दुकाने बंद राहिल्यामुळे दुकानदारांसह मोठ मोठ्या कंपन्यांचे हा नुकसान झाले असून या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांवर उपास मारीची वेळ आहे. त्यामुळेच पालिका आयुक्तांनी इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर दुकाने सुरू करण्याचे आदेश बुधवारी राञी दिले.

या पूर्वी राज्यसरकारने सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच, नागरिकांनी राञीपासून दुकानांबाहेर रांगा लावल्या, त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा ही वाजले. पोलिसांना गर्दी पांगवताना अनेक अडचणी ही आल्या, त्यामुळेच पालिका आयुक्त प्रवीण परदेशींनी शहरातील सर्व मद्यविक्री करणाऱ्या दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. सध्या कोरोनामुळे मुंबईची अवस्था खूपच नाजबक होत चालली आहे. कोरोनाचे गुरूवारी 769 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 25 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळेच खबरदारी घेत पालिका प्रशासन पाऊले उचलताना दिसत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement