Advertisement

कंटेन्मेंट झोनमध्ये नियम मोडल्यास सोसायटी पदाधिकारी जाणार तुरुंगात

कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) मधील रहिवाशांना नियमांचं उल्लंघन करणं आता चांगलंच महागाात पडणार आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये नियम मोडल्यास सोसायटी पदाधिकारी जाणार तुरुंगात
SHARES

कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) मधील रहिवाशांना नियमांचं उल्लंघन करणं आता चांगलंच महागाात पडणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये राज्य सरकार आणि महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन रहिवाशांकडून झाल्यास संबंधित सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना एक महिना तुरुंगवास आणि २०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तशी नोटीसच पालिकेच्या माटुंगा येथील एफ-उत्तर विभागाने जारी केली आहे. 

एखाद्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्यास तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जातो. या क्षेत्राव्यतिरिक्त सीलबंद इमारती ही आणखी एक वर्गवारी पालिकेने केली आहे. सील केलेल्या या परिसरांसाठी पालिका आणि पोलिसांनी काटेकोर नियमावली बनवली आहे. या ठिकाणी सामाजीक वावर, मास्क तसंच सरकारी नियमांचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र त्यानंतरही या भागातील रहिवासी नियमांचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळ यांनी आपल्या अखत्यारीतील परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी नियमांचं उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. सायन कोळीवाडा परिसरात शिवाजी चौक परिसरातील सोसायटीला अशी नोटीस देण्यात आली आहे. संबंधित सोसायट्यांना जीवनावश्यक वस्तूंसाठी त्या भागातील दुकानदारांकडून व्यवस्था करण्यात येईल, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा