Advertisement

कोरोनाचा मुंबई पोर्ट ट्रस्टला फटका

मुंबई बंदरातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये वाहन निर्यातीच् प्रमाण मोठे आहे. मात्र, यंदा हे प्रमाण घसरलं आहे.

कोरोनाचा मुंबई पोर्ट ट्रस्टला फटका
SHARES

जीवघेण्यात कोरोना व्हायरसचा जागतिक पातळीवर प्रसार होत धोका निर्माण झाल्यानं अनेक देशांमध्ये दुसऱ्या देशातील वस्तूंच्या आयात-निर्यातीवर निर्बंध आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टलाही याचा मोठा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई बंदरातून एप्रिल ते जून या कालावधीत अवघ्या १४ हजार ३०१ वाहनांची निर्यात झाली, तर गतवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हे प्रमाण ५१ हजार ८३९ एवढे होते.

मुंबई बंदरातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये वाहन निर्यातीच् प्रमाण मोठे आहे. मात्र, यंदा हे प्रमाण घसरलं आहे. लॉकडाऊन कालावधीत २३ मार्च ते ९ जुलैपर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे ४२९ मालवाहू जहाजांच्या माध्यमातून आयात-निर्यात करण्यात आली. गतवर्षी २३ मार्च ते ९ जुलै या कालावधीत ६२३ मालवाहू जहाजांद्वारे ही आयात-निर्यात करण्यात आली होती.

ड्राय बल्कमध्ये ३,०३२ हजार टन आयात-निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण ५,०५१ हजार टन होते. ब्रेक बल्कमध्ये ७९९ हजार टन आयात-निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण १,६४१ हजार टन होते. लिक्विड बल्कमध्ये ९,४७० हजार टन आयात-निर्यात झाली. गतवर्षी हे प्रमाण ११,१३९ हजार टन होते. कंटेनर मालवाहतुकीत २२ हजार टन माल हाताळण्यात आला, तर गतवर्षी हे प्रमाण ९१ हजार टन इतके होते. 



हेही वाचा -

Online School: बालवाडी ते १२ वी ‘असा’ होईल अभ्यास, आॅनलाईन वर्गांचं वेळापत्रक जाहीर

Lower Parel Bridge लोअर परळ पुलाचं काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा