Advertisement

केईएम रुग्णालयातील १७ जणांना कोरोनाचा संसर्ग?


केईएम रुग्णालयातील १७ जणांना कोरोनाचा संसर्ग?
SHARES

मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयातील ५ डॉक्टरांसह १७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणं ३०० जणांना विलग करण्यात आल्याचंही समजतं आहे.

केईएम रुग्णालयातील कोव्हिड कक्षामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. त्या सर्वांची तपासणी करून गरजेनुसार अतिदक्षता विभागात किंवा कोव्हिड कक्षामध्ये पाठवण्यात येते. ज्यांची चाचणी नकारात्मक येते, त्यांच्याकरीता वेगळी सुविधा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये आलेल्या एका रुग्णानं कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाशी संपर्क आल्याचं सांगितलं नव्हतं. त्यामुळं येथील काही वैद्यकीय कर्मचारी आणि उपचार करणारे डॉक्टर यांच्यामध्येही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आलं होतं.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनानं डॉक्टर आणि इतर सर्व वैद्यकीय कर्मचारी सातत्यानं काम करत असल्याचं सांगितलं व संसर्गाची शक्यता असलेल्यांची काळजीही घेतली जात असल्याचं स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा