Advertisement

लाँकडाऊनमध्ये शिथिलता देताच रस्त्यांवर वाहनांची गर्दी

वाशी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लाँकडाऊनमध्ये शिथिलता देताच रस्त्यांवर वाहनांची गर्दी
SHARES
मुंबईत 31 मे रोजी लाँकडाऊनमध्ये मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांंनी शिथिलता देेेेताच, आज मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पहायला मिळाली. मागील दोन महिन्यांपासून लाँकडाऊनमुळेे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत होता. वाशी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी देशात लाँकडाऊन जाहिर केले. त्या दिवसापासून मुंबईच्या रस्त्यांवर वाहनांंची वरदळ पूर्णतहा थांबली. गल्लोगल्ली पोलिसांनी नाकाबंदी लावत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरु केली. आतापर्यंत लाँकडाऊनचे उल्लघंन करणाऱ्यावर 1 लाखाहून अधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यातील काही शहर वगळता कमी झालेला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंञी यांनी 31 मे रोजा लाँकडाऊनमध्ये शिथिलता जाहिर केली. त्यामुळे मुंबईच्या टोल नाक्यांवर आता वाहनांची पून्हा गर्दी दिसू लागली आहे.

मुंबईत पश्चिम उपनगरातील दहिसर टोल नाक्यावर ही तिच परिस्थिती आहे. तर मुलुंड टोल नाक्यावर ही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहायला मिळत होत्या. त्यामुळेे लाँकडाऊनमध्ये जरी शिथिलता दिली असली. तरी धोका अजून टळलेला नाही हे नागरिकांनी समजून शक्यतो घराबाहेर न पडावे असे आवाहन पोलिस ठिक ठिकाणी करत आहेत.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा