Advertisement

मुंबई विद्यापीठाचे ८ कर्मचारी कोरोनाबाधित


मुंबई विद्यापीठाचे ८ कर्मचारी कोरोनाबाधित
SHARES

मुंबई विद्यापीठात ही कोरोनानं शिरकाव केला असून विद्यापीठातील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, ६० हुन अधिक कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे कामकाज नुकताच सुरू झालं आहे. विद्यापीठाने कामकाज सुरू होताच स्थायी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्याची सोय केली. त्यावेळी अस्थायी स्वरूपात काम करणाऱ्या १२०० कर्मचाऱ्यांनाही विमा द्यावा, अशी मागणी होती. परंतु ती अद्याप मान्य झालेली नाही.

स्थायी कर्मचाऱ्यांसाठी ३ लाखांच्या विम्याची तरतूद करणाऱ्या विद्यापीठाचे बाधित अस्थायी कर्मचारी वाऱ्यावर आहेत. अशातच कामकाज सुरू होऊन महिना उलटला असतानाच ८ कर्मचाऱ्यांना लागण झाली. परीक्षा व मूल्यमापन विभागातील वरिष्ठ लिपिक, शिपाई, फोर्टच्या विधी विभागातील वरिष्ठ लघु लेखिका, जे.बी.आय. एम. एस.चे हवालदार आणि लेखापाल, ग्रंथालय शिपाई, सेवा निवृत्ती लाभचे कनिष्ठ लिपिक आदी कर्मचारी बाधित झाले असून त्यांच्या सहवासात आलेले ६० ते ७० कर्मचारी सध्या विलगीकरणात आहेत. 

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या विभागातील कामकाज थांबवण्याबाबत विद्यापीठाने कोणतेही अधिकृत आदेश दिलेले नाहीत. परंतु विभागवार प्रत्येक वरिष्ठांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना १९ जुलैपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. अधिकृत सूचना न मिळाल्याने काही कर्मचारी कामावर गेले. मात्र, विभागांना टाळे असल्याने त्यांना घर गाठावे लागले.

राज्यात सोमवारी ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.हेही वाचा - 

University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बससंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा