Advertisement

पानकर कुटुंबानं 'अशी' केली कोरोनावर मात


SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत गुरूवारी १३६५ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच ५८ जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळं या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका राज्यसरकार प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासून महापालिकेनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. परंतु, या उपाययोजनांचा लाभ खरंच सर्व मुंबईकरांना मिळतो आहे का? मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशाच एका कोरोना योद्धा अभय पानकर यांच्याशी मुंबई लाइव्हनं बातचीत केली.


कोरोना योद्धा यांनी अभय पानकर यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सरकारी उपयायोजनांचा खूप वाईट अनुभव आल्याचं म्हटलं. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या सुविधा न मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. कोरोनाची लागण झाल्याचं समजताच त्यांनी सरकारी दवाखान्यात उपचारासाठी प्रयत्न केले. परंतु, येथून त्यांना नकार मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाची लागण झाली त्यावेळी सरकारी दवाखान्यात चौकशी केली असता खाट उपलब्ध नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तसंच, रग्णवाहिका उपलब्ध नव्हती असं त्यांनी म्हटलं.

परंतु, या जीवघेण्या व्हायरसमधून यशस्वी बाहेर पडण्यासाठी अभय यांनी स्वखर्चानं कोरोनाची चाचणी, क्वारंटाइन खर्च केला. मुंबई महापालिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करत असल्याचा दाव करते. परंतु, या सेवेसाठी संपर्क साधला असता नकार मिळाल्याचं तसंच, सेवा उपलब्ध नसल्याचं महापालिकेनं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १९२ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३६५ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी  दिवसभरात ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा