Advertisement

लॉकडाऊनमुळं मुंबईच्या डबेवाल्यांची आर्थिक स्थिती बिकट


लॉकडाऊनमुळं मुंबईच्या डबेवाल्यांची आर्थिक स्थिती बिकट
SHARES

मुंबईतील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या चाकरमान्यांना वेळेवर डबा पोहोचवण्याचे काम मुंबईचे डबेवाले करतात. मात्र, या लॉकडाऊनचा फटका या डबेवाल्यांना ही बसला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतरही ठप्प आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहेत.

डबेवाल्यांना मोठ्या आर्थिक समस्यांचा ही सामना करावा लागतं आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत डबेवाल्यांना दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याने ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबईचे ५ हजार डबेवाले दररोज ६ लाख चाकरमान्यांना डबा पोहोचवण्याचे काम करतात. विरार ते चर्चगेट, कल्याण ते सीएसएमटी आणि पनवेल अशा तिन्ही मार्गावर डबे पोहोचवणारे हे डबेवाले, मुंबईची जीवनवाहिनी असणारी लोकल सेवेवर बहुतांश अवलंबून आहेत. परंतु, लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचा व्यवसाय अजूनही बंद आहे.

डबेवाले प्रत्येक ग्राहकाकडून दर महिन्याकाठी ८०० ते १५०० रुपये आकारतात. बहुतांश डबेवाले मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्याकडे घरभाडे भरायलाही पैसे नसल्याने गावी गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, मुळशी, आंबेगाव, जुन्नर येथील पन्नास टक्के लोक डबेवाले म्हणून कार्यरत आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा