Advertisement

लॉकडाऊनमुळं मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले

मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे.

लॉकडाऊनमुळं मुंबईतले ध्वनी प्रदूषण घटले
SHARES

कोरोनाच्या वाढत्य प्रादुर्भावामुळं मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळं पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. त्याशिवाय, मुंबईतील ध्वनी प्रदूषणाची पातळी खाली घसरल्याची नोंद आवाज फाऊंडेशनने केली आहे. लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून आवाजाचा स्तर कमी नोंदविण्यात येत आहे. आवाज फाऊंडेशन ध्वनी प्रदूषणाचं मोजमाप करण्याचं काम करत असून, लॉकडाऊन लागू झाल्यापासून, सातत्याने ध्वनी प्रदूषणाचा स्तर कमी नोंदविण्यात येत असल्याचे फाऊंडेशनचं म्हणणं आहे.

मार्च महिन्यात आवाजाची पातळी ५२.६ डेसिबल नोंदविण्यात आली होती. एप्रिल महिन्यात आवाजाची पातळी ५६.४ डेसिबल नोंदविण्यात आली. मे महिन्यात आवाजाची पातळी ५२.९ एवढी नोंदविण्यात आली. वांद्रे आणि आसपासच्या परिसरातील आवाजाच्या पातळीची ही नोंद असली तरीदेखील संपुर्ण मुंबईत ध्वनी प्रदूषणाचे प्रमाण कमीच राहिले आहे. रस्त्यावर कमी प्रमाणात वाहत असलेली वाहने, बंद असलेले उद्योगधंदे, बंद असलेली कार्यालये, बंद असलेली लोकल, एक्सप्रेस यासह अनेक  घटक लॉकडाऊनमुळे बंद असल्याने आवाजाचे प्रमाण कमी असल्याचे नोंदविले जात आहे.

याचपूर्वीच्या काळात आवाजाची पातळी ८५ ते १०० डेसिबलच्या आसपास नोंदविण्यात आल्याची माहिती मिळते. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेच्या पातळीचं विश्लेषण करण्यासाठी वातावरण संस्थेने सिपिसिबीच्या संकेत स्थळावरील आकडेवारीचा उपयोग केला होता. २५ मार्च रोजी रात्री १२ वाजता करण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या घोषणे अगोदरच मुंबई शहर हे राज्याने घोषित केलेल्या लॉकडाऊनचे पालन करत होते. याचाच परिणाम म्हणून मुंबई शहराच्या हवा-प्रदुषणाच्या पातळी मध्ये १७ मार्चपासूनच घट झाल्याचं समोर आलं आहे.

लॉकडाऊनमुळं हवा प्रदूषित करणारे घटक नियंत्रणात असल्यानं साहजिकच मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी हवेची गुणवत्ता चांगली, उत्तम व समाधानकारक नोंदविण्यात येत आहे. विशेषत: रस्त्यांवर वाहनं नसल्यानं हवेतील प्रदूषण मोठया प्रमाणावर कमी झालं आहे.



हेही वाचा -

राज्यात अनलॉकडाऊन १.० ला शुक्रवारपासून सुरूवात

'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा