Advertisement

सायन रुग्णालयाच्या खिडकीतून कोरोनाग्रस्ताचा पळण्याचा प्रयत्न


सायन रुग्णालयाच्या खिडकीतून कोरोनाग्रस्ताचा पळण्याचा प्रयत्न
SHARES

कोरोनाच्या रुग्णांवर मृतदेहाच्या शेजारी उपचार होत असल्याची सायन रुग्णालयातील धक्कादायक घटना ताजी असतानाच याच रुग्णालयातून एका कोरोना रुग्णानं पळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचप्रमाणं भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

किरीट सोमय्या यांनी शेअक केलेल्या व्हिडीओमध्ये एक कोरोना रुग्ण रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारताना दिसत आहे. 'सायन रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील हा व्हिडीओ आहे. ३ मे रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी हा प्रकार घडला. त्याला सुरक्ष रक्षकांनी पकडून परत आणलं. हा तोच वॉर्ड आहे, ज्या वॉर्डमध्ये रुग्णांसोबत मृतदेह ठेवण्यात आले होते. या घटनेवर 'वाह रे ठाकरे सरकार', अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

सायन रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. २४ तासांत त्याचा अहवाल मागवण्यात आल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा