Advertisement

अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचंय? मग, 'असा' मिळवा ई-पास

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असल्यानं राज्य सरकारनं ई-पास प्रणाली लागू केली आहे.

अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचंय? मग, 'असा' मिळवा ई-पास
SHARES

देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लागू लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. तथापि, कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये घट झाल्यास देशातील काही भागात २० एप्रिलपासून लॉकडाउन शिथिल करण्यात येऊ शकतो. सामाजिक दुरावा आणि एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या हालचाली रोखून कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे, हे लॉकडाउनचे मुख्य उद्दीष्ट आहे.

लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असल्यानं राज्य सरकारनं ई-पास प्रणाली लागू केली आहे. हा ई-पास वापरून लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. ई-पासच्या सहाय्यानं आरोग्य, वैद्यकीय, वीज, पाणी यासारख्या आवश्यक सुविधा मिळवण्यासाठी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतो. 

आम्ही तुम्हाला आपल्या राज्यात ई-पास कसे मिळवू शकता हे आम्ही सांगणार आहोत.

  • महाराष्ट्रात https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर तुम्हाला ई पासचा अर्ज करता येईल.
  • वर दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून 'अप्लाई ई-पास' वर क्लिक करा.
  • ई-पास फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरा
  • कोणत्याही दस्तावेजची प्रत मागितली असल्यास ती अपलोड करुन अर्ज सबमिट करा.
  • एकदा आपला पास मंजूर झाल्यावर आपणास अधिकाऱ्यांकडून संदेश मिळेल
  • ई-पास प्रतीचे प्रिंट आउट घेऊन आपण बाहेर जाऊ शकता.


ई-पाससाठी आवश्यक असलेल्या सेवांची यादी

या यादीपैकी काही कारण असेल तरच तुम्हाला ई पास मिळेल.  

  • कायदा व सुव्यवस्था सेवा
  • वाहने (केवळ आणीबाणीसाठी ट्रक, कार आणि बाइक)
  • पोलिस
  • अग्निशमन विभाग
  • वीज
  • पाणी
  • अन्न पुरवठा
  • आरोग्य कर्मचारी
  • बँक
  • मीडिया
  • रुग्ण
  • मृत्यू प्रकरण
  • आरोग्य सेवा


ई-पास अर्जासाठी आवश्यक माहिती

तुम्हाला ई-पास हवा असेल तर तुम्हाला अर्ज करावा लागेल. या अर्जात तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे.  

  • अर्जदाराचा जिल्हा
  • शहर
  • नाव
  • फोन नंबर
  • अधिकृत आयडी
  • वाहन नोंदणी क्रमांक




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा