Advertisement

कोरोनामुळं घरकामगारांवर आर्थिक संकट


कोरोनामुळं घरकामगारांवर आर्थिक संकट
SHARES

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळं अनेक ठिकाणी घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसंच, अनेत इमारतींच्या गेटवर 'बाहेरील व्यक्तीस आत प्रवेश नाही,’ अशी पाटी लावण्यात आली आहे. त्यामुळं घरकामगारांना या प्रवेश मनाईच्या पाटीनं एकाएकी परकं करून टाकलं आहे. काही घरकामगारांना मार्चचा पगार देखील मिळालेला नाही, एप्रिलच्या तर पगाराची आशाच नाही. त्यामुळं कुटुंबाचं आर्थिक नियोजन बिघडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

घरांमध्ये जेवण, धुणीभांडी, इत्यादी काम या घरकामगार करतात. काही घरकामगारांनी मार्चचा पगार आगाऊ घेतला होता. आतापर्यंत तो खर्च झाला आहे. रजा भरपगारी असणार की नाही याबाबत अजूनही संदिग्धता आहे. घरकाम करणाऱ्यांमध्ये बऱ्याचशा महिला बांधकाम मजुरांच्या पत्नी आहेत. गेले बरेच दिवस बांधकाम आणि घरकाम दोन्ही बंद असल्यानं त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. 

या महिलांचे वित्तसंस्थेत खाते नाही किंवा त्यांना गुगल पे वापरता येत नाही. प्रतिबंधित झालेल्या वस्त्यांमधून बाहेर पडता येत नाही. काही ज्येष्ठ घरकामगारांना तर कामावरून काढूनच टाकण्यात आल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा