Advertisement

कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा, पहा तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत

कोरोनाच्या नव्या रुग्णांनी ओलांडला १० हजारांचा टप्पा, पहा तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले
SHARES

राज्यात कोरोनाचे आज ८८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. मात्र परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कालपर्यंत १० हजाराच्या आत असणाऱ्या कोरोना रुग्णांनी गुरूवारी १० हजाराचा टप्पा ओलंडला आहे. आज ११,१४७ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४८  हजार १५०  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले ११,१४७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६),नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-१५ (१), पुणे- ४३३ (२१), पुणे मनपा-१८८९ (५२), पिंपरी चिंचवड मनपा-९८७ (१०), सोलापूर-२२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील                                

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,१३,१९९) बरे झालेले रुग्ण- (८६,४४७), मृत्यू- (६३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,१५८)

ठाणे: बाधीत रुग्ण- (९१,७८४), बरे झालेले रुग्ण- (५७,३३५), मृत्यू (२५२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१,९२३)

पालघर: बाधीत रुग्ण- (१५,२७८), बरे झालेले रुग्ण- (९१५५), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८०१)

रायगड: बाधीत रुग्ण- (१६,१६१), बरे झालेले रुग्ण-(१०,६५४), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१४२)

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (१६९१), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७३३)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३५८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०)

पुणे: बाधीत रुग्ण- (८६,२२५), बरे झालेले रुग्ण- (३५,३८२), मृत्यू- (२०२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८,८१५)

सातारा:  बाधीत रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (२०११), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५५४)

सांगली: बाधीत रुग्ण- (२०९२), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४९)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (४५७१), बरे झालेले रुग्ण- (१३९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०८३)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (८८७३), बरे झालेले रुग्ण- (४२११), मृत्यू- (४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१६५)

नाशिक: बाधीत रुग्ण- (१४,२९५), बरे झालेले रुग्ण- (८४८३), मृत्यू- (४५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३५६)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (४४१७), बरे झालेले रुग्ण- (२३५१), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२००६)

जळगाव: बाधीत रुग्ण- (१०,४३८), बरे झालेले रुग्ण- (७०८८), मृत्यू- (५१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८३५)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९१)

धुळे: बाधीत रुग्ण- (२८५५), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२०)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१३,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८४०), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४१४)

जालना: बाधीत रुग्ण- (१९१३), बरे झालेले रुग्ण- (१४२१), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१९)

बीड: बाधीत रुग्ण- (७१७), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (४५२)

लातूर: बाधीत रुग्ण- (१९३९), बरे झालेले रुग्ण- (९६४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८९)

परभणी: बाधीत रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (२१९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४७)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (५४७), बरे झालेले रुग्ण- (४०१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१६१२), बरे झालेले रुग्ण (६७९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६५)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०३)

अमरावती: बाधीत रुग्ण- (१९८४), बरे झालेले रुग्ण- (१३६२), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६३)

अकोला: बाधीत रुग्ण- (२५३५), बरे झालेले रुग्ण- (१९०९), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५११)

वाशिम: बाधीत रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (११८१), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८३)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (८५५), बरे झालेले रुग्ण- (४६९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५९)

नागपूर: बाधीत रुग्ण- (४४९४), बरे झालेले रुग्ण- (१९२८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४९५)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८१)

भंडारा: बाधीत रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१९३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (४१२), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (३७७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२९)

एकूण: बाधीत रुग्ण-(४,११,७९८) बरे झालेले रुग्ण-(२,४८,६१५),मृत्यू- (१४,७२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४८,१५०)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा