Advertisement

Coronavirus Pandemic: सोशल डिस्टंन्सिग ठेवत दादर, भायखळा भाजी मार्केट सुरू

लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सोशल डिस्टन्सिग ठेवत सुरू करण्यात आलं आहे.

Coronavirus Pandemic: सोशल डिस्टंन्सिग ठेवत दादर, भायखळा भाजी मार्केट सुरू
SHARES

लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सोशल डिस्टन्सिग ठेवत सुरू करण्यात आलं आहे. तसंच नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील  सर्व कामकाज नियमित करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे.

दादरच्या सेनापती बापट मार्गावर घाऊक भाजीपाला पुरवठा करणारे व्यापारी बसतात. या सगळ्यांना हटवत पोलिसांनी काही अंतरावर वर्तुळ करून त्यांना बसण्याची जागा उपलध करून दिली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिग होऊन गर्दी टाळण्यासही मदत होणार आहे. इतर भाजीपाला मार्केटमध्ये देखील गर्दी कमी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

शासनाच्या वतीने भाजीपाला,अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नियोजन करण्यात येत असून भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना पोलिसांनी आडवू नये त्यांना मार्गस्थ करण्यात यावे असे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहे. याबाबत त्यांनी मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामे वाहने पोलिसांनी तात्काळ सोडावी असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय