Advertisement

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन

अनुयायांनी स्थानिक स्तरावर आणि मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून अभिवादनाचे कार्यक्रम करावेत, असेही समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन
SHARES

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने केले आहे. अनुयायांनी स्थानिक स्तरावर आणि मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून अभिवादनाचे कार्यक्रम करावेत, असेही समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांनी चैत्यभूमीवर मोठी गर्दी करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुंबईत चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी दाखल होतात. यंदा कोरोनाच्या संकटात मोठ्या संख्येनं अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी दाखल झाल्यास सामाजिक अंतराच्या नियमांचा भंग होऊन करोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळं समितीनं नागरिकांनी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी न येता स्थानिक स्तरावर कार्यक्रम करण्याचे आवाहन केलं आहे. 

राज्य सरकारनं महापरिनिर्वाणदिनी शासकीय वंदना द्यावी, तसंच मानवंदना कार्यक्रमाचे देशभरात थेट प्रक्षेपण आणि चैत्यभूमीचे ऑनलाइन दर्शन केलं जावं, अशी मागणी समितीच्या वतीनं राज्य सरकारकडं करण्यात आली आहे. यंदा महापरिनिर्वाणदिनी समितीच्या वतीनं रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा