Advertisement

Coronavirus Updates: धारावीत विलगीकरण अशक्य

दाटीवाटीच्या परिसरामध्ये संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

Coronavirus Updates: धारावीत विलगीकरण अशक्य
SHARES

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावीचा उल्लेख केला जातो. त्या ठिकाणी एकही करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडू नये यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्ययंत्रणेनं मोठे प्रयत्न केले. परंतु, धारावीमधील एका रुग्णाचा मृत्यू हा करोनाच्या संसर्गामुळे झाला. तसंच, हा रुग्ण राहत असलेल्या परिसरातील ८ इमारतींमधील ३०८ सदनिकांमधील व्यक्तींना घरामध्येच विलग करण्यात आलं आहे. 

धारावीमधील झोपडीवजा घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या परिसरात एका घरामध्ये राहणाऱ्यांची संख्या ८ ते १० आहे. रात्री अनेकजण बाहेरही झोपतात. करोना संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्ययंत्रणेसह पोलिसांची गस्तही वाढत आहे. कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगरमध्ये घरी विलगीकरण केलेले अनेक व्यक्ती बाहेर फिरत असल्याचं समजतं.

झोपड्यांमध्ये सतत बसून राहणं शक्य नसल्याचं सांगून ते बाहेर पडत आहेत. त्यामुळे परिसरातील लोकांसोबत त्यांचे वादही होतात. हातावर मारलेले शिक्के तेलाचा तसेच इतर द्रव्याचा वापर करून काढून टाकण्याचाही प्रयत्न होतो. संशयित म्हणजे करोना झाला असे नाही, असाही युक्तिवाद करून भांडणे केली जातात.

अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा वापर या व्यक्तींकडून केला जातो. त्यामुळे विलगीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तातडीने सुविधा उपलब्ध करण्याची व्यवस्था संबधित यंत्रणेने केली आहे. दाटीवाटीच्या परिसरामध्ये संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढेल, अशा वेळी या वस्तीसाठी वेगळा विचार करण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

Coronavirus Update: कोरोनाचं निदान फक्त ५ मिनिटांत, रॅपिड टेस्टला परवानगी मिळाली

लॉकडाऊनचा असाही इफेक्ट! माणसं 'पिंजऱ्यात', प्राणी रस्त्यावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा