Advertisement

coronavirus update: कोरोनाचं निदान फक्त ५ मिनिटांत, रॅपिड टेस्टला परवानगी मिळाली

कोरोना रुग्णांच्या रॅपिड टेस्टला केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत एखाद्या रुग्णाला करोनाची लागण झाली की नाही याचं प्राथमिक निदान होऊ शकणार आहे.

coronavirus update: कोरोनाचं निदान फक्त ५ मिनिटांत, रॅपिड टेस्टला परवानगी मिळाली
SHARES

कोरोना रुग्णांच्या रॅपिड टेस्टला केंद्र सरकारने मान्यता दिल्यामुळे अवघ्या ५ मिनिटांत एखाद्या रुग्णाला करोनाची लागण झाली की नाही याचं प्राथमिक निदान होऊ शकणार आहे. या रॅपिड टेस्टमुळे वेळ वाचून रुग्णांवर त्वरित उपचार करणं शक्य होणार आहे. एका बाजूला राज्यात वेगाने पसरत असताना कोरोना संशयितांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. 

आरोग्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी दुपारी देशातील सर्व मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. त्यानंतर प्रसारमाधम्यांशी सवांद साधताना टोपे यांनी ही माहिती दिली. यावेळी टोपे म्हणाले, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकारकडून कुठल्या उपाययोजना करण्यात येत आहेत, याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आज सादर करण्यात आला. 

हेही वाचा - कोरोना संशयितांचे नमुने घेऊ नका, किटच्या कमतरतेमुळे खासगी प्रयोगशाळांना निर्देश

तात्काळ मान्यता

राज्यात १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० कोरोना चाचण्या होत आहेत. त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होणार आहे. परंतु कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता आणखी प्रयोगशाळांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे राज्यात रॅपिड टेस्टची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पंतप्रधानांना यावेळी करण्यात आली.

उपचार शक्य 

त्यावर कोरोना संशयितांच्या टेस्ट वाढवण्याचा सल्ला देताना रॅपिड टेस्ट करण्याची परवानगी महाराष्ट्राला दिली, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. रॅपिड टेस्टमुळे कोरोना संशयितांच्या रक्ताचे नमुने घेतल्यावर केवळ ५ मिनिटांत संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे समजेल. तसंच एखादी व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्यास त्या रुग्णाचं तात्काळ विलगीकरण करून त्याच्यावर ताबडतोब उपचार करता येतील, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा - धारावीत सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

दरम्यान, खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाकडून म्हटलं जात आहे. परंतु टेस्टिंग किटच्या कमतरतेमुळे आता कोरोना व्हायरसच्या संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेऊ नका, असं निर्देश आरोग्य विभागाकडून खासगी प्रयोगशाळांना देण्यात आले आहेत. 
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा