Advertisement

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; एकाच इमारतीत २२ रुग्ण

मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या २२ लोकांचा एकाचवेळी कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; एकाच इमारतीत २२ रुग्ण
SHARES

मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या २२ लोकांचा एकाचवेळी कोरोनाची लागण झाली आहे. सिंधी सोसायटी परिसरात हा प्रकार घडला. परिणामी, चेंबूर (chembur) परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सिंधी सोसायटीत जवळपास ५०६ लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळं कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेनं (bmc) आता वेगानं हालचाली सुरु केल्या आहेत. महापालिकेनं ही इमारत आणि सिंधी सोसायटी पूर्णपणे सील केली आहे. तसंच, महापालिकेनं घरकामासाठी येणाऱ्या महिलांनाही सोसायटीत जाण्यास मज्जाव केला आहे. या सोसायटीत कम्युनिटी किचन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक वाढताना दिसत आहे. मुंबईत दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १० हजार ४२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ हजार ७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत दिवसभरात २३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १४ पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर ८० टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३५ दिवसांवर येऊन ठेपलाय. ३१ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर १.९१ टक्के झाला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा