Advertisement

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी असा साजरा केला सहकाऱ्याचा वाढदिवस...


रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी असा साजरा केला सहकाऱ्याचा वाढदिवस...
SHARES
Advertisement

मुंबईवर ओढवलेल्या कोरोना संसर्गाने अनेक पोलिस ञस्त असून उपचार घेत आहेत. यातील एका पोलिस नाईकाचा वाढ दिवस रुग्णालयातील डाँक्टर आणि सहकाऱ्यांनी वेगळ्या प्रकारे साजरा केला. ड्युटीच्या अनिश्चित वेळेमुळे वर्षातून एकदा येणारा वाढ दिवस चुकूनच कधीधरी त्यांना  आठवत असेल. माञ हा वाढ दिवस त्या पोलिस नाईकाला कायमचा लक्षात राहील हे माञ नक्की. 

पोलिस म्हटलं की आठवते ती कडक शिस्त... पण या पोलिसांच्याही मनात एक निरागसता आहे. एक साधेपणा आहे. आणि हेच त्या पोलिसाचे वेगळेपण चुकलात तर शिक्षा, कुठे अडकलात तर मदतीचा हात ही त्यांच्याकडूनच पहिल्यांदा येतो हे विसरून चालणार नाही. सध्या मुंबईत कोरोनाने 1809 पोलिस हे कोरोनाने बाधित आहे. त्यातील 656 हे फक्त मुंबई पोलिस दलातील असून आतापर्यंत 18 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.

 जुहू एटीएस विभागातील पोलिसात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला क्वारन्टाईन केलं आहे. आज त्याचा वाढ दिवस होता. अशा आनंदाच्या क्षणी प्रत्येकालाच आपल्या घरातली  व्यक्ती डोळ्यासमोर नसल्याने सकाळपासूनच ते थोडे नरवस होते. आपल्या या मिञाचा हसरा चेहरा पाहण्यासाठी पोलिस आणि रुग्णालयातील नर्स आणि डाँक्टरांनी त्याचा वाढ दिवस अनोख्या पद्धतीने साजरी करत, त्यांना अनोखि भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार रुग्णालयात केक आणून त्या शिपायाचा वाढ दिवस सर्वांच्या उपस्थितीत अनोख्या पद्धतीने साजरा केला. ऐवढेच नाही तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी ही झिंगाट गाण्यावर  ही डान्स केला. पोलिसाच्या या वाढ दिवसाची व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

 

संबंधित विषय
Advertisement