Advertisement

मुंबई विमानतळाच्या तिकिटांच्या किमतीत वाढ, प्रवासी शुल्कातही वाढ

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची ऑपरेटर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (मिआल) मुंबई विमानतळावर पायाभूत सुविधा विकास आणि तंत्रज्ञान सुधारणा प्रकल्प यासाठी हे शुल्क आकारण्यात येईल असे सुचवले होते.

मुंबई विमानतळाच्या तिकिटांच्या किमतीत वाढ, प्रवासी शुल्कातही वाढ
SHARES

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने मंजुरी दिलेल्या प्रवासी सुविधा निर्माण शुल्काच्या (युझर डेव्हलपमेंट फी) अंमलबजावणीमुळे मुंबईतून (mumbai) होणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाच्या तिकिटाच्या किमती (ticket prices) शुक्रवार 16 मेपासून वाढणार (increase) आहेत. हे शुल्क 31 मार्च 2029 रोजीपर्यंत लागू राहील.

प्रवासी सुविधा निर्माण शुल्कामुळे देशांतर्गत प्रवासासाठी 175 रुपये तर परदेशवारीसाठी 615 रुपये प्रवाशांना अधिक मोजावे लागणार आहेत. हे वाढीव शुल्क विमान तिकिटात समाविष्ट केले जाणार आहे.

ऑगस्ट, 2024 पर्यंत हे शुल्क देशांतर्गत प्रवासासाठी 120 रुपये होते. सध्या फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हे शुल्क लागू होते. मुंबईत येणाऱ्या देशांतर्गत प्रवासांना 75 रु. तर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 260 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

या शुल्कवाढीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत तिकिटांसाठी 250 तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 875 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. सर्वसाधारणपणे हे शुल्क एखाद्या विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटांवर लावण्यात येते. मात्र मुंबई विमानतळावर हे शुल्क जाणाऱ्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही प्रवासांवर लावण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टची (csmia) ऑपरेटर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (मिआल) मुंबई विमानतळावर पायाभूत सुविधा विकास आणि तंत्रज्ञान सुधारणा प्रकल्प यासाठी हे शुल्क आकारण्यात येईल असे सुचवले होते.

देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 650 रुपये शुल्काचा प्रस्ताव दिला होता. या शुल्कवाढीमुळे, स्वच्छतागृहांपासून, प्रवासाचा अनुभव सुधारणार आहे का, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

दरम्यान, विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने प्रवासी सुविधा निर्माण शुल्कातील वाढीला (user development fees) मान्यता दिल्याने मुंबईहून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 175 रुपये, तर परदेश प्रवासाला 615 रुपये आता अधिक मोजावे लागणार आहेत. शुक्रवार 16 मे पासून ही वाढ लागू होईल. हे वाढीव शुल्क विमान तिकिटामध्ये समाविष्ट करण्यात येईल.



हेही वाचा

महाराष्ट्र शासनाचे शाळांसाठी नवे नियम

नालासोपाऱ्यातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण - ईडीने 13 ठिकाणी छापे टाकले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा