Advertisement

मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेज पालिकेच्या ताब्यात, इथंही १००० बेड्सची व्यवस्था

सध्या ही ठिकाणं क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणार आहेत.

मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेज पालिकेच्या ताब्यात, इथंही १००० बेड्सची व्यवस्था
SHARES

दिवसेंदिवस COVID 19 चे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारनं क्वारंटाईन केंद्रामध्ये वाढ केली आहे. याअंतर्गतच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदानात (BKC) आणि गोरेगावमधील नेस्को (NESCO) इथं जंबो केअर सेंटर उभारण्यात आलं.

आता पालिकेनं वांद्रे इथला मेहबूब स्टुडिओ देखील ताब्यात घेतला आहे. फक्त मेहबुब स्टुडिओच नाही तर फोर्ट इथलं झेवियर्स, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि मांटुगांचे डिजी रुपारेल कॉलेज ताब्यात घेतलं आहे. सध्या ही ठिकाणं क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येणार आहेत.  

मेहबुब स्टुडिओमध्ये जवळपास १००० बेड्सची सोय करण्यात आली आहे. सेंट झेवियर्स कॉलेज आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट्स इथं देखील बेड्स लावले आहेत. तर माटुंगाच्या डीजी रूपारेल कॉलेजचे सभागृहही ताब्यात घेण्यात आलं आहे.

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि पालक मंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी मेहबुब स्टुडिओला भेट दिली. क्वारंटाईनसाठी लागणाऱ्या साऱ्या सुविधा पुरवण्यात येतील. स्वच्छता आणि क्वारंटाईन व्यक्तीच्या आरोग्याकडे योग्य ते लक्ष ठेवता येईल.  या सेंटरमध्ये एच पश्चिम आणि पूर्व प्रभागातील रूग्णांना ठेवण्यात येईल. एच पश्चिम प्रभागात प्रामुख्यानं वांद्रे, खार आणि सांताक्रूझचा समावेश आहे. पूर्वेमध्ये वांद्रे, कलिना आणि सांताक्रूझच्या काही भागाचा समाविष्ट आहे.

एच पूर्व या वॉर्डमध्ये १००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर ३५ हून अधिक मत्यूंची नोंद झाली आहे. तर एच पश्चिममध्ये ४१९ रुग्ण आढळली असून ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शास्त्री नगर, खार दांडा आणि गझरबांध यासारख्या ठिकाणी देखील अनेक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

अस्लम शेख म्हणाले की, आम्ही या केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणं असलेले आणि लक्षणं नसलेले पण कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना ठेवणार आहोत. इथं जवळपास १००० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वैद्यकिय कर्मचारी म्हणजेच डॉक्टर, नर्स हे एकाच ठिकाणी असतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

आयकॉनीक सेंट झेवियर्स कॉलेजचा हॉल आणि कँटिनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना ठेवण्यात येणार आहे. जवळपास १८० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कॅम्पसमधील झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च बिल्डिंगच्या टेरेसवर ७० बेड्सची व्यवस्था केली आहे. याशिवाय जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या हॉलमध्येही ८० बेड्स व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकिय क्षेत्रातील मुख्य अधिकारी किथ डिसोझा म्हणाले की, पालिकेनं रुग्णांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी जागेची मागणी केली होती. आम्हाला सांगण्यात आले की कोरोनाग्रस्त रूग्णांचे जवळचे संपर्क इथं ठेवले जातील. किमान २०० बेड्स लावण्याची योजना आहे.

कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा म्हणाले की, अप्लाइड आर्ट्स शाळेच्या तळमजल्यावरील हॉल केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्यात आला. जवळपास ८० बेड्सची सुविधा तिथं करण्यात आली आहे.



हेही वाचा

खाजगी डॉक्टरांकडून पीपीई किटची मागणी

मुंबईहून कुटुंबासोबत घरी गेला, पण दुसऱ्या दिवशी गंगेत सापडला मृतदेह

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा