Advertisement

खाजगी डॉक्टरांकडून पीपीई किटची मागणी


खाजगी डॉक्टरांकडून पीपीई किटची मागणी
SHARES

मुंबईत कोरोनाचया रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशी परिस्थिती असताना मुंबईतील अनेक खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळं बंद असलेल्या या खाजगी दवाखान्यांवर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले. त्यावर खाजगी डॉक्टरांनी कारवाई न करण्याची मागणी करत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट उपलब्ध करून द्याव्यात असं म्हटलं. 

महापालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेद्वारे यापूर्वी वारंवार देण्यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी अद्याप काही नर्सिंग होम, हॉस्पिटल व खासगी रुग्णालये बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळं कोरोनाव्यतिरीक्त इतर आजार असलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. त्यांची गैर सोय देखील होत होती. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका आयुक्तांनी कारवाईचा निर्णय घेतला.

सुरू झालेल्या या खासगी रुग्णालयांना महापालिकेद्वारे 'पीपीई किट' देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसंच, आयुक्तांच्या या निर्णयानंतर डॉक्टरांनी क्लिनीक सुरी करण्यासाठी पीपीई किट गरजेच असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणं, कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा मिळणं हेही तितकचं गरजेच आहे, असं म्हटलं.



हेही वाचा -

पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी एका वर्षासाठी स्थगित

तब्बल २ महिन्यानंतर मुंबई लोकल ट्रेन रुळावर...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा