Advertisement

तब्बल २ महिन्यानंतर मुंबई लोकल ट्रेन रुळावर...


तब्बल २ महिन्यानंतर मुंबई लोकल ट्रेन रुळावर...
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांची लाइफलाइन हळूहळू रुळावर येऊ लागली आहे. मध्य रेल्वेनं मंगळवारी पहिली लोकल सोडली आहे. ही लोकल केवळ रेल्वे कर्मचाऱ्यासाठीच सोडण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं गेली २ महीने लोकल बंद होती. परंतु, तब्बल २ महिन्यांननंतर बंद असलेली लोकल मंगळवारी रुळावर धावली.

मध्य रेल्वेतर्फे रेल्वेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी दिवसाला लोकलच्या ८ फेऱ्या सुरु झाल्या आहेत. सीएसटी-पनवेल, सीएसटी-कर्जत, सीएसटी-कसारा या मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल धावणार आहेत. तसंच, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आल्यानं सामान्य प्रवाशांसाठी या लोकल धावणार नाहीत. त्यामुळं कुणीही रेल्वे स्थानकावर फिरकु नये, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा