Advertisement

पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी वर्षभरासाठी स्थगित

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं दिलेल्या निवेदनाला केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी वर्षभरासाठी स्थगित
SHARES

कोरोनामुळं आगामी गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असताना गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पीओपीवर बंदी घालण्यात आली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डानं जाहीर केलेल्या सुधारित नियमावलीत (मार्गदर्शक तत्त्वे) हे स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु, गणेशोत्सव केवळ ३ महिन्यांवर येऊन ठेपला असताना, किमान या वर्षासाठी या नियमावलीतून सुटका व्हावी अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे. समितीच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी एका वर्षासाठी स्थगित करण्यात आली आहे.

केंद्राच्या नव्या नियमावलीनुसार, मूर्तिकारच नव्हे तर, सार्वजनिक मंडळं, स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरगुती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठीही नियमावली आहे. मात्र, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं दिलेल्या निवेदनाला केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा - यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

या स्थगितीनंतर 'सर्व मूर्तिकारांना याद्वारे आश्वस्त करून ईच्छितो की मुर्तिकारांचे कुठलेही नुकसान होऊ नये यासाठी समिती कटिबद्ध आहे. यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करायचा असून त्यानुसार मंडळे, कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे व गणेशोत्सवा दरम्यान भाविक, तसेच आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे', असं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं म्हटलं आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर काही वर्षांपूर्वी पर्यावरणपूरक उत्सवाच्या अनुषंगानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. अनेक बैठकांनंतर २०१०मध्ये 'मूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तत्त्वे' जाहीर करण्यात आली. यामध्ये प्लास्टिकचा वापर तसेच मूर्तीच्या उंचीवर निर्बंध यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले होते. मात्र मागील काही वर्षांत उत्सवासंबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्यानं बुधवारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली होती.हेही वाचा -

यावर्षी मुंबईतही शाडूच्या मातीचे गणपती!

तब्बल २ महिन्यानंतर मुंबई लोकल ट्रेन रुळावर...Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा