मुंबईहून कुटुंबासोबत घरी गेला, पण दुसऱ्या दिवशी गंगेत सापडला मृतदेह

असं काय घडलं जे मुंबईहून त्याच्या घरी गेलेल्या तरूणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी गंगेत सापडला.

मुंबईहून कुटुंबासोबत घरी गेला, पण दुसऱ्या दिवशी गंगेत सापडला मृतदेह
SHARES

कोरोनामुळे प्रेम, नाती हे सर्व निरर्थक झालं आहे. मुंबईहून आपल्या घरी गेलेल्या जोडप्याला घरच्यांनी आणि सासरच्यांनी घरात घेण्यास नकार दिला. मुंबईहून बायको आणि एक वर्षाच्या मुलीला घरी घेऊन गेलेल्या तरुणाला इतकं निराश केलं की त्यानं गंगामध्ये उडी मारून स्वत:चा जीव दिला.     

सुधीर पांडे (वय 32) हा रेवतीपूर गावचा रहिवासी असून तो मुंबईत खासगी नोकरी करायचा. मंगळवारी तो मुंबईतून कसा बसा पत्नी रेणू आणि एक वर्षाची मुलगी आरुषिसमवेत गाझीपुरला पोहोचला. घरी पोहोचल्यावर कुटुंबीयांनी त्याला बाहेरच रोखलं आणि कोरोना चाचणी केल्यानंतरच घरात येण्याचा इशारा दिला.

घरातून निराश होऊन निघालेल्या सुधीरनं एक कार भाड्यानं घेतली. भाड्यानं घेतलेल्या गाडीतून तो कुटुंबासमवेत बलिया इथल्या सासरच्या घरी जाण्यास निघाला. बायकोनं तिच्या माहेरी फोन करून आम्ही येत असल्याचं कळवलं. पण तिकडून पण नकार मिळाला. त्यांनी घरी राहण्यास परवानगी दिली नाही.

रात्री दोन वाजेपर्यंत तो कुटुंबासोबत बाहेर फिरत होता. अचानक अब्दुल हमीद सेतूवर सुधीरनं कार थांबवली. गाडीतून खाली उतरत त्यानं पत्नी आणि मुलीकडे पाहिले. काही विचार न करता सुधीरनं पुलावरून गंगेमध्ये उडी मारली. पत्नीची ओरड ऐकून तिथं उपस्थित असलेला एक पोलिस आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. बराच शोध घेतल्यानंतर बुधवारी सकाळी मृतदेह नदीतून सापडला.

पतीच्या मृत्यूला फक्त माझे आजोबा आणि सासरचे लोक जबाबदार असल्याचं सुधीरच्या पत्नीनं पोलिसांना सांगितलं. जर घराबाहेरच्या खोलीत राहण्याची परवानगी मिळाली असती तर सुधीरनं आत्महत्या केली नसती. सुधीर आणि रेणूचा प्रेम विवाह होता. राजागंज चौकीचे प्रभारी म्हणाले की, कोरोनाच्या भीतीमुळे कुटूंबाने घरात कुणालाही प्रवेश दिला नाही. याच रागाच्या भरात त्या तरूणानं गंगेत उडी मारली.



हेही वाचा

घाटकोपरमध्ये क्वारन्टाइन सेंटरला विरोध, विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबईला छावणीचे स्वरुप, 'या' ठिकाणी CISF आणि CRPF चे जवान तैनात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा