Advertisement

मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेली तरूणी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेली एक तरूणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेली तरूणी कोरोना पॉझिटिव्ह
SHARES

मुंबईहून सिंधुदुर्गला गेलेली एक तरूणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये सापडलेला हा कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा आता पूर्णपणे बरा असून त्याच्या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

कुडाळ तालुक्यातील घोडगे सोनवडे गावातील एका १४ वर्षीय मुलीची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही मुलगी मुंबईतून गावी आली आहे. या मुलीच्या आजोबांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाल्यामुळे मुंबईतून ही मुलगी आणि कुटुंबीय रितसर परवानगी घेऊन जिल्ह्यात आले. हे सर्व जण गावी पोहचायच्या आधीच आजोबांवर अंत्यसंस्कार झाले होते. दरम्यान, ग्रामस्थांनी या कुटुंबीयांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावात यायला मनाई केली. त्यामुळे ते गावात जाऊच शकले नाहीत.

मुंबईतून आलेल्या या पाचही जणांना गेले आठ दिवस आरोग्य विभागानं क्वारंटाइन केलं आहे. यातील बाकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र मुलीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिचा कुणाकुणाशी संपर्क आला याचा शोध आता यंत्रणा घेत आहे आणि त्यानुसार दक्षतेचे उपाय योजत आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा