Advertisement

शिवसेनेच्या डावपेचाने तुर्डेच्या गटनेतेपदाची घोषणा लांबली

मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची महापालिकेतील गटनेता म्हणून निवड केल्यानंतर त्याची घोषणा गुरुवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणं आवश्यक होतं. परंतु सभागृहाचं सर्व कामकाज झाल्यानंतरही महापौरांनी तुर्डे यांचं पत्र पटलावर न घेता मनेसला सत्तेची ताकद दाखवून दिली.

शिवसेनेच्या डावपेचाने तुर्डेच्या गटनेतेपदाची घोषणा लांबली
SHARES

मुंबई महापालिकेतील मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षातील विलिनीकरणाची प्रक्रीया कायदेशीर बाबीत अडकल्याने मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची महापालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेता म्हणून निवड केल्यानंतर त्याची घोषणा गुरुवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणं आवश्यक होतं. परंतु सभागृहाचं सर्व कामकाज झाल्यानंतरही महापौरांनी तुर्डे यांचं पत्र पटलावर न घेता मनेसला सत्तेची ताकद दाखवून दिली.


शेवटपर्यंत तंगवलं

आपल्या नावाची घोषणा व्हावी म्हणून तुर्डे सभागृहात उभं राहून महापौरांकडे मागणी करत होते. परंतु त्यांना सभागृहाच्या बाहेर हाकला, अशाप्रकारची टिपण्णी करत महापौरांनी त्यांना शेवटपर्यंत तंगवलं.


अद्याप मंजुरी नाही

मनसेचे महापालिका गटनेते दिलीप लांडे यांच्यासह ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी यावर कोकण विभागीय आयुक्तांकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्टया पक्षांतर केलेले सर्व नगरसेवक हे मनसेचेच असल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवक संजय तुर्डे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे.


सभा पुढे ढकलण्याचा प्रयत्न

याबाबतचं पत्र पक्षाने महापौरांनाही सादर केलं आहे. परंतु नोव्हेंबर महिन्याची पहिली सर्वसाधारण सभा २३ तारखेला असल्याने ही घोषणा लांबली होती. परंतु या सभेत गटनेतेपदाची घोषणा केल्यास पक्षाची नाचक्की होईल म्हणून माजी नगरसेविका वकारुनिस्सा अंसारी यांचा शोकप्रस्ताव मांडून सभा पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता.


'असं' केलं तुर्डेंना गप्प

परंतु गुरुवारी झालेल्या सभेत स्थायी समितीच्या दोन रिक्त पदांसाठी शिवसेनेच्या सुजाता पाटेकर आणि भाजपाच्या यादव यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर तुर्डे यांच्या नावाची घोषणा होणं आवश्यक होतं. परंतु या दोन सदस्यांच्या निवडीनंतर महापौरांनी टीबीच्या जनजागृतीबाबतची शपथ घेऊन फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली आणि शेवटपर्यंत तुर्डे यांच्या नावाची घोषणा केलीच नाही. त्यामुळे तुर्डे यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांना खाली बसण्याच्या सूचना करत गप्प केलं.



हेही वाचा-

शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी संजय तुर्डे ची लाचलुचपत विभागाकडे तक्रार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा