Advertisement

विरोधकांना मान्य, संजय तुर्डे मनसेचे गटनेता


विरोधकांना मान्य, संजय तुर्डे मनसेचे गटनेता
SHARES

मनसेच्या ६ नगरसेवकांनी पक्षांतर करून शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात लटकलेला असतानाच मनसेने आपला एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. मनसेने महापौरांना पत्र पाठवून तुर्डे यांच्या नियुक्तीबाबत कळवलं असून त्याची औपचारिक घोषणा येत्या महापालिका सभागृहात व्हायची आहे.


सामील करून घेतलं

परंतु ही घोषणा टाळण्यासाठी एका बाजूला शिवसेना पळवाट शोधत असतानाच विरोधी पक्षांनी संजय तुर्डे यांना गटनेता म्हणून आपल्यासोबत सामील करून घेतलं आहे. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित होण्याचं आवाहन करताना मनसे गटनेता म्हणून संजय तुर्डे यांच्या नावाचा उल्लेख केला.


सेना-भाजपाच्या विरोधासाठी

मुंबईतील समस्यांबद्दल तसेच मुंबईकर जनतेच्या विरोधातील निर्णयांना विरोधी पक्ष म्हणून अधिक सक्षम बनवण्यासाठी पालिकेतील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शिवसेना-भाजपचा विरोध केला पाहिजे, असं आवाहन सपाचे गटनेते रईस शेख यांनी महापालिकेतील सर्व विरोधी पक्षांना केलं.


मिळून मिसळून राहा

मुंबई महापालिकेत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रवी राजा विरोधी पक्षनेते आहेत. परंतु विरोधी पक्षनेत्याला न जुमानता आपणच महापालिकेतील विरोधी पक्षनेता असल्याप्रमाणे वावरणाऱ्या समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांना उपरती झाल्याचं दिसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कायम विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका बजावत असले तरी समाजवादी पक्ष हा केवळ पहारेकऱ्यांसोबतच वावरत असल्याने विरोधी पक्षांची बाजू कमकुवत बनत होती.


कानउघडणी झाली

अखेर समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी रईस शेख यांनी कानउघडणी करून विरोधी पक्षांशी मिळून मिसळून राहण्याचा सल्ला दिल्याने रईस शेख यांनी विरोधकांसोबत राहून यापुढे महापालिकेचं कामकाज करण्याचा निर्धार केल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा

…तर ते ‘सहा’ नगरसेवक देतील पदाचे राजीनामे!

अहो आश्चर्यम्, मनसेच्या नगरसेवकांनाच 'खळ्ळ खट्याक'चा कंटाळा?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा