Advertisement

corona virus : कोरोनाचा होईल विनाश, जुहूतल्या इस्काॅन टेम्पलमध्ये हातावर शिंपडलं जातंय गोमूत्र

जुहूतल्या इस्काॅन टेम्पल मध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचा हात, सॅनिटायझरने स्वच्छ करण्याऐवजी चक्क गोमूत्राने स्वच्छ करत आहेत.

corona virus : कोरोनाचा होईल विनाश, जुहूतल्या इस्काॅन टेम्पलमध्ये हातावर शिंपडलं जातंय गोमूत्र
SHARES

कोरोनासारख्या संसर्ग रोगाची प्रत्येकानेच धास्ती घेतली असताना प्रत्येकजण या रोगापासून बचाव करण्याच्या उद्देशाने वेगवेगळे उपाय करून बघत आहे. त्यातच काही महाशयांना असं वाटते की गोमुत्राचा वापर केल्यास कोरोना आपल्या आजूबाजूलाही फिरकू शकत नाही. याच समजूतीतून जुहूतल्या इस्काॅन टेम्पलमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याऐवजी चक्क गोमूत्राने स्वच्छ करण्यात येत आहे. 

 

अंधेरी येथील इस्काॅन टेम्पल ट्रस्टचं एक गोविंद रेस्टाॅरंट नावाच्ं रेस्टाॅरंट आहे. राजू नायर यांना त्यांच्या मित्राने सोमवारी  या रेस्टाॅरंटमध्ये भेटायला बोलावलं होतं. त्यानुसार ते इस्काॅन टेम्पलमधील रेस्टाॅरंटमध्ये गेले असता त्यांना टेम्पलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांनी रोखलं. त्यांची तपासणी केल्यानंतर राजू यांना हात पुढे करण्यास सांगून सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या हातावर द्रव्य टाकून हात चोळण्यास सांगितलं. ते सॅनिटायझर असावं या उद्देशाने राजू यांनी हात चोळल्यानंतर त्यांना तीव्र गंध आला. त्यांनी या द्रव्याबाबत सुरक्षा रक्षकांकडे विचारणा केली असता सुरक्षा रक्षकांनी ते गोमूत्र असल्याचं त्यांना सांगितलं. राजू यांनी त्यांचा हा अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. 

 

कुणाच्याही परवानगी शिवाय त्यांच्यावर गोमूत्र शिंपडणं हे कुणालाच आवडणार नाही. मी देवळात गेलो नव्हतो. मी त्या परिसरातील रेस्टाॅरंटमध्ये जेवणासाठी जात होतो. मात्र घडलेला हा प्रकार माझ्या श्रद्धा आणि तत्वांच्या विरोधात असल्याचं मला वाटलं. याबाबत सुरक्षा रक्षकाकडे विचारणा केली असता त्यांनी ‘स्वतःच्या शुद्धीकरणासाठी लोक गोमूत्र पितात, मग हातावर शिंपडल्यास काय हरकत आहे’ अशी प्रतिक्रिया दिल्याचं राजू नायर हे सांगतात. त्यांना आलेला हा अनुभव त्यांनी ट्विटरवर शेअर केला असून त्यावर अनेकांकडून  तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. 

 हेही वाचाः- Corona virus :...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना स्थानबद्ध करणार- राजेश टोपे

 हेही वाचाः- Corona virus : मुंबईत  जमावबंदी कशासाठी? जाणून घ्या कलम१४४ म्हणजे काय

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा