मध्य रेल्वे (central railway) 17 आणि 18 सप्टेंबर, 2024 रोजी (मंगळवारी आणि बुधवारी रात्री) सीएसएमटी मुंबई आणि कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर गणपती विसर्जनासाठी (ganpati visarjan) प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी 22 विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या धावणार आहेत.
हार्बर लाइनवर विशेष उपनगरीय गाड्या सीएसएमटी मुंबई ते पनवेल 17 आणि 18.09.2024 रोजी (मंगळवारी आणि बुधवारी रात्री) धावतील.
खाली दिलेल्या वेळेनुसार विशेष गाड्या सीएसएमटी मुंबई आणि कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील:
डाउन मेन लाइनवर
- सीएसएमटी-कल्याण स्पेशल 1 सीएसएमटी मुंबईहून (mumbai) 01.40 वाजता सुटेल आणि 03.10 वाजता कल्याणला पोहोचेल.
- सीएसएमटी-ठाणे स्पेशल 1 सीएसएमटी मुंबईहून 02.30 वाजता सुटेल आणि 03.30 वाजता ठाण्याला पोहोचेल.
- सीएसएमटी-कल्याण स्पेशल 3 सीएसएमटी मुंबईहून 03.25 वाजता सुटेल आणि 04.55 वाजता कल्याणला पोहोचेल.
UP मेन लाईनवर
- कल्याण-सीएसएमटी स्पेशल 2 कल्याणहून (kalyan) 00:05 वाजता निघेल आणि 01.30 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
- ठाणे-सीएसएमटी स्पेशल 2 ठाणे (thane) येथून 01.00 वाजता निघेल आणि 02.00 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
- ठाणे-सीएसएमटी स्पेशल 4 ठाणे येथून 02.00 वाजता सुटेल आणि 03.00 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
डाऊन हार्बर लाईनवर
- सीएसएमटी-पनवेल (panvel) स्पेशल 1 सीएसएमटी मुंबईहून 01.30 वाजता सुटेल आणि 02.50 वाजता पनवेलला पोहोचेल.
- सीएसएमटी-पनवेल स्पेशल 3 सीएसएमटी मुंबईहून 02.45 वाजता सुटेल आणि 04.05 वाजता पनवेलला पोहोचेल.
UP हार्बर लाईन वर
- पनवेल-सीएसएमटी स्पेशल 2 पनवेलहून 01.00 वाजता निघेल आणि 02.20 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
- पनवेल-सीएसएमटी स्पेशल 4 पनवेलहून 01.45 वाजता निघेल आणि 03.05 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
हेही वाचा