
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने (central railway) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), मुंबई आणि छपरा (Chhapra) दरम्यान 4 अतिरिक्त फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे:
1) 05084 फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन शुक्रवार 31.10.2025 रोजी दुपारी 2 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी 04.45 वाजता छपरा येथे पोहोचेल.
2) 05083 फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन बुधवार 29.10.2025 रोजी रात्री 20.00 वाजता छपरा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
रचना: 10 एसी-3 टियर इकॉनॉमी, 4 स्लीपर क्लास, 4 सेकंड सीटिंग चेअर कार, 1 सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
3) 05588 फेस्टिव्हल स्पेशल शनिवारी, 01.11.2025 रोजी दुपारी 2 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी 04.45 वाजता छपरा येथे पोहोचेल.
4) 05587 फेस्टिव्हल स्पेशल गुरुवारी, 30.10.2025 रोजी रात्री 20.00 वाजता छपरा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
रचना: 2 एसी 2 टियर, 6 एसी 3 टियर, 2 एसी-3 टियर इकॉनॉमी, 5 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 सेकंड सिटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.
05084/05083 आणि 05588/05587 साठी थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कंपलापती, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर. गोमती नगर, बाराबंकी, गोंडा, बस्ती, गोरखपूर, कप्तानगंज, रामकोला, पडरौना, थावे, दिघवा दुबौली आणि मसरख.
सीएसएमटी/एलटीटीकडे परतणाऱ्या गाड्यांचे तपशील:
1.गाडी क्रमांक 01032 बनारस-सीएसएमटी (CSMT) विशेष बनारसहून 04.00 वाजता सुटते, भुसावळला 00.25 वाजता (दुसऱ्या दिवशी) पोहोचते आणि 04.15 वाजता सीएसएमटीला पोहोचते.
2. ट्रेन क्रमांक 01080 गोरखपूर-सीएसएमटी विशेष गाडी गोरखपूर येथून 14.30 वाजता सुटेल, भुसावळ येथे 15.20 वाजता (पुढच्या दिवशी) पोहोचेल आणि सीएसएमटी येथे 00.40 वाजता पोहोचेल.
3. ट्रेन क्रमांक 01144 दानापूर-एलटीटी विशेष गाडी दानापूर येथून 21.30 वाजता सुटेल, भुसावळ येथे 20.25 वाजता (पुढच्या दिवशी) पोहोचेल आणि एलटीटी येथे 04.50 वाजता पोहोचेल.
4. ट्रेन क्रमांक 05585 सहरसा येथून 17.45 वाजता सुटेल, भुसावळ येथे 22.10 वाजता (पुढच्या दिवशी) पोहोचेल आणि एलटीटी येथे 05.30 वाजता पोहोचेल.
5. ट्रेन क्रमांक 01180 सावंतवाडी रोड-एलटीटी विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून 22.20 वाजता निघेल आणि एलटीटी येथे 10.40 वाजता पोहोचेल.
6. ट्रेन क्रमांक 01052 बनारस-एलटीटी विशेष गाडी बनारस येथून सकाळी 6.35 वाजता निघून भुसावळ येथे सकाळी 8.10 वाजता (पुढील दिवशी) पोहोचेल आणि दुपारी 4.40 वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर बुकिंग खुली आहे.
सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या अनारक्षित निवासस्थानासाठी सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी यूटीएस प्रणालीद्वारे बुकिंग करता येते.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांना या विशेष ट्रेन सेवांचा लाभ घेण्याची विनंती आहे.
हेही वाचा
